पिट्टीगुडा नं. 2 येथील रखडलेला शाळेच काम त्वरित पुर्ण करा गाववाशीयांची मागणी #Jivati

Bhairav Diwase
जिवती:- तालुक्यातील पिट्टीगुडा नं.2 येथील शाळेच काम गेल्यां एक वर्षापासुन सुरु असुन अजुन पर्यंत काम पुर्ण झालेला नाही आहे कंत्राटदाराने या कडे सततच दुर्लक्ष करुन कामाला विलंब करत असल्याचे गाववासीयांचा आरोप आहे.
२०२० ला या शाळेच्या कामाला सुरुवात करण्यात आली व अद्यापही काम पुर्ण झालेला नाही व कत्रांटदारास विचारणा केल्यास आज करतो उद्या करतो असा उडवा उडवीचे प्रतीऊत्तर देऊन कामास विलंब करत असल्याचा आरोप गाववासीयांनी आमच्या प्रतिनीधीच्या माध्यमातून सांगीतले आहे हा काम एका महिण्याचे आत झाल नाही तर कत्रांटदाराच्या विरोधात आम्ही रस्त्यावर उतरु असा ईशारा दिला आहे या वेळी लक्ष्मण पवार डिंगाबंर पवार सुरेश चव्हाण सह गांवातील प्रतिष्ठित उपस्थितीत होते.