Top News

वाघाच्या हल्ल्यात तीन शेळ्या ठार #Attack

कक्ष क्रमांक ९४ मधील घटना
पोंभूर्णा:- पोंभूर्णा वनपरिक्षेत्रात वाघाची दहशत कायम असून आज कसरगट्टा बिट कक्ष क्रमांक ९४ नजीक शेतशिवारात चराईसाठी गेलेल्या बकऱ्याच्या कळपावर वाघाने हल्ला चढवून तीन बकऱ्या ठार केल्याची घटना बुधवारला दुपारी एक वाजताच्या सुमारास घडली.
पोंभूर्णा वनपरिक्षेत्रातील कसरगट्टा बिटातील कक्ष क्रमांक ९४ नजीकच्या दिलीप कपूर यांच्या शेताजवळ कसरगट्टा येथील मेंढपाळ बकऱ्याचे कळप चारत होता. त्याच शेतशिवारात दबा धरून बसलेल्या वाघाने बकऱ्याच्या कळपावर हल्ला चढवून यातील तीन बकऱ्या ठार केले.मेंढपाळानी आरडाओरड केल्याने वाघ तिथून पळ काढला.
सध्या या परिसरात वाघाने धुमाकूळ घातला असून कसरगट्टा परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. पोंभूर्णा वनपरिक्षेत्रात महिण्याभरात वाघाच्या हल्ल्यात अनेक घटना घडल्या आहेत. अगदी आज झालेल्या वाघाच्या हल्ल्याच्या घटनेपासून हाकेच्या दुरावर असलेल्या कविठबोळी शेतशिवारात पंधरा दिवसा अगोदर वाघाने एका महिलेला ठार केले होते. तर वेगवेगळ्या ठिकाणी वाघाने गंभीर जखमी केले होते. त्यामुळे गावकऱ्यांनी वनविभागाकडे वाघाचे बंदोबस्त करण्यासाठी मागणी केली होती. वाघाचे हल्ले रोखण्यासाठी वनविभागाने उपाययोजना करण्याची मागणी पुन्हा जोर धरत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने