Top News

पेटगांव येथील मोतीबिंदू शिबिरात 164 रुग्णांची शस्त्रक्रियेकरिता निवड #Sindewahi

जि. प. सदस्य रमाकांत लोधे यांचा सामाजिक उपक्रम
सिंदेवाही:- चंद्रपूर जिल्ह्यात मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया तथा रक्तदान शिबिरांची एक लोकचळवळ उभी करणारे व्यक्तिमत्व म्हणून जि.प.सदस्य श्री रमाकांत लोधे यांची विशेष अशी ओळख आहे. मागील सातत्याने 15 वर्षापासून अखंडितपणे मोतीबिंदू शिबिरांच्या माध्यमातून 15, 500 रुग्णांना नवी दृष्टी देण्याचे महत कार्य श्री. रमाकांत लोधे यांचे हस्ते झाले आहे.
मागील 2 वर्ष कोरोना महामारीमुळे या कार्याला काहीसा खंड पडला परंतु आता परिस्थिती थोडी निवळली.सर्व सार्वजनिक कार्यक्रमांना मुभा मिळाल्याने श्री रमाकांत लोधे यांनी सिंदेवाही तालुक्यातील मौजा पेटगांव येथे सेवाग्राम मेडिकल कॉलेज, लायन्स क्लब चंद्रपूर ,श्री,गुरुदेव सेवा मंडळ, पेटगांव ,तालुका काँग्रेस कमिटी, सिंदेवाही आणि श्री रमाकांत लोधे मित्र परिवाराच्या वतीने नुकतेच भव्य मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन केले.
सदर शिबिरात 520 रूग्णांची नोंदणी करून तपासणी करण्यात आली आणि रुग्णांची शस्त्रक्रिये करीता निवड करण्यात आली. शिबिराच्या उदघाटन करुण
कार्यक्रमाला सुरवात केली. शिबिराच्या उभारणी करिता लायन्स क्लबचे अध्यक्ष डॉ. श्रीकांत जोशी, सचीव श्री. दिलीप चांडक, कार्यवाहक श्री. दिनेश बजाज आणि सेवाग्राम नेत्र रुग्णांलयाचे डॉक्टर आणि चमू यांनी सहकार्य केले सोबतच शिबिराच्या यशस्वीतेकरीता श्री गुरुदेव सेवा मंडळ, पेटगांव येथील सचिन गेडाम आणि पदाधिकारी ,श्री. इम्रान पठाण ग्रा.प.सदस्य ,श्री मंगेश मेश्राम,श्री संतोष हेड़ाऊ,श्री वासुदेव दडमल ग्रा.प.सदस्य ,श्री. कपिल मेश्राम, श्री. टीकाराम कुंभरे ,श्री. माणिक गेडाम, श्री. दिलीप तोड़फड़े, श्री. राजू गेडाम यांनी मेहनत घेतली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने