विवाहित महिलेची विष पिऊन आत्महत्या #suicide #pombhurna

Bhairav Diwase
पोंभूर्णा :- पोंभूर्णा पोलिस स्टेशन हद्दीतील चेक कोसंबी नंबर २ येथील विवाहित महिलेनी विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना दि. २८ डिसेंबरला सकाळी नऊ वाजता च्या सुमारास घडली. तिला तात्काळ चंद्रपूर येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
📸
मात्र तीची उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली. शालिनी सिद्धार्थ उराडे वय ३५ वर्ष असे मृतक महिलेचे नाव आहे.
सदर मृतक महिलेचे शवविच्छेदन चंद्रपूर येथे करण्यात आले. विवाहितेच्या मृत्यूचे कारण अजून पर्यंत कळू शकले नाही. पुढील तपास पोलीस करीत आहेत. 📸