💻

💻

tv9 प्रतिनिधी निलेश डाहाट यांना बेदम मारहाण #Beating

शिवसेना कार्यकर्त्यांची गुंडगिरी
चंद्रपूर:- शहरातील इंदिरानगर भागात अवैध धंदे करणाऱ्या शिवसैनिक विक्रांत सहारे आणि पवन नगराळे यांनी काल रात्री 11.30 वाजता चंद्रपूरचे tv9 प्रतिनिधी निलेश डाहाट यांना बेदम मारहाण केली. त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

विधिमंडळ लोकलेखा समिती अध्यक्ष आ. सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत tv9 चे चंद्रपूर जि. प्र. निलेश डाहाट यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा उल्लेख करत राज्यातील बिघडलेल्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न प्रकर्षाने पुढे आणला.

यातील सहारे जिल्हा युवासेना समन्वयक आहे. इंदिरानगर भागात देशोन्नती प्रतिनिधी विनोद बदखल आणि डाहाट गप्पा करत होते. तेव्हा सहारे-नगराळे यांनी तेथे पोचत अवैध धंद्यांची बातमी प्रकाशित केल्यावरून वाद केला. तो शांतही झाला. मात्र घटनास्थळावरून घरी जाण्यासाठी निघालेल्या डाहाट यांचा सहारे-नगराळे जोडीने पाठलाग करून त्यांना रामबाग वसाहत वळणावरील मूल मार्गावरच्या माता मंदिराजवळ थांबवून लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली.
रस्त्यावरील बांधकामाचे गट्टू त्यांना मारण्यात आले. शस्त्राचा आणि चाकूचा धाक दाखविला गेला. मदतीसाठी काही लोक थांबले तेव्हाच आरोपी पसार झाले. या घटनेत डाहाट यांना पोट-पाठीवर जबर गुप्त मार लागला आहे. सोबतच ओठ फाटल्याने टाके बसले आहेत. उपचार सुरू आहे. निलेश डहाट यांचेवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा पत्रकार संघाने तिव्र निषेध व्यक्त करून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत