चंद्रपूर जिल्ह्यातील वरोराजवळ आढळले "डायनासोर" सदृश्य जीवाश्म #warora

Bhairav Diwase
(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
चंद्रपूर:- वरोरा तालुक्यातील तुळाणा गावाजवळून वाहणाऱ्या वर्धा नदीच्या परिसरात डायनासोरचे जीवाश्म आढळून आले. चार फूट लांब, एक फूट रुंद पायाचे हाड, तीन फूट लांब बरगडीचे हाड पाहता ते डायनोसोरचे असल्याचा दावा भूशास्त्र प्रा. सुरेश चोपणे यांनी केला. चंद्रपूर जिल्ह्यातील पिजदुरा, गडचिरोली जिल्ह्यातील वडधम येथे यापूर्वी डायनोसरचे जीवाश्म आढळले आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील भूभागावर ज्युरासिक काळात डायनोसोरचे अस्तित्व होते. ज्युसासिक काळात येथील जलाशयात जलचर प्राण्यांचा वावर होता. महाकाय डायनोर या भागात अस्तित्वात असल्याचे पुरावे आढळले आहेत. जिल्ह्यातील पिजदुरा आणि गडचिरोली जिल्ह्यातील वडधम येथे डायनासोरचे जिवाश्म यापूर्वी आढळले. त्यामुळे अनेक अभ्यासक पिजदुरा येथे भेट देऊन जिवाश्मांचा अभ्यास करतात.
वरोरा तालुक्यात तुळाणा गाव आहे. या गावाजवळून वर्धा नदी वाहते. या भागातील विजय ठेंगणे, शाळकरी मुले नदी पात्रात फिरत होते. तेव्हा त्यांना हाड सदृश्य खडक आढळला. याची माहिती संशोधक प्रा. चोपणे यांना मिळाली. त्यांनी नदी परिसराला भेट देऊन पाहणी केली. तेव्हा ती हाडे जीवाश्म असून डायनोसोर किंवा हत्तीसारख्या मोठ्या प्राण्याची असावी असा अंदाज व्यक्त केला. चार फूट लांब, एक फूट रुंद पायाचे हाड, तीन फूट लांब बरगडीच्या हाडाचा आकार पाहता ते डायनोसोर असल्याचा अंदाज प्रा. चोपणे यांनी व्यक्त केला.