17 वर्षीय तरुणाचा विहिरीत पडून मृत्यू #death

Bhairav Diwase
गोंडपिपरी:- दि.4 जानेवारी रोज मंगळवारला चेक दरूर शेत शिवारात दोन वाजताच्या दरम्यान घटना घडली आहे. म्रुतकाचे नाव गौरव उर्फ डोनेश्वर गजानन नागापुरे रा.चेक दरूर वय 17 वर्ष असे आहे
प्राप्त माहितीनुसार गौरव उर्फ डोनेश्वर बैलाला पाणी पाजण्यासाठी शेतावर गेला होता. शेतात असलेल्या विहीरीतुन पाणी काढत असताना अचानक त्याचा पाय घसरल्याने तो विहिरीत पडला. विहिरीत पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने आणि त्याला पोहता येत नसल्याने त्याचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती गोंडपीपरी पोलिसाना देण्यात आली असता घटनास्थळी पोलीस कर्मचारी हजर झाले असून मृतदेह विहिर बाहेर काढण्यात आला असून शवविच्छेदनाकरिता ग्रामीण रुग्णालय गोंडपीपरी येथे पाठविण्यात आला आहे.‌ पुढील तपास गोंडपिपरी पोलीस करीत आहेत.