कोवीड १९ च्या वाढता प्रादुर्भावामुळे गोंडवाना विद्यापीठाने हिवाळी २०२१ च्या लेखी परीक्षा पुढे ढकलल्या #examगोंडवाना विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील सर्व प्राचार्यांना व संबंधित विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की, दि . १०.०१.२०२२ पासून नियोजीत विद्यापीठाच्या शैक्षणिक सत्र २०२१-२२ मधील हिवाळी २०२१ च्या लेखी परीक्षा, कोव्हीड -१ ९ या साथरोगाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. परीक्षेसंबधी पुढील नियोजनाबाबत यथोचितरीत्या कळविण्यात येईल. सर्व संबधीतांनी याची नोंद घ्यावी व याबाबत वेळोवेळी विद्यापीठाच्या संकेतस्थळाचे अवलोकन करावे.
 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत