जाहिरात... Advertisement... विज्ञापन

रविवारी 300 बुथवर "मन की बात" #chandrapur

भारतीय जनता पार्टी, महानगर चंद्रपूरचे आयोजन
चंद्रपूर:- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील, अल्पावधीतच लोकप्रिय ठरलेल्या'मन की बात' या कार्यक्रमाचे रविवार(30 जानेवारीला दिवसा 11.30 वाजता देशभरात प्रसारण केले जाणार आहे.चंद्रपूर महानगरातील जनतेला याचा लाभ घेता यावा म्हणून महानगर भाजपा सज्ज झाली आहे.
विधिमंडळ लोकलेखा समिती अध्यक्ष व माजी अर्थमंत्री आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात व भाजपा जिल्हाध्यक्ष(श) डॉ मंगेश गुलवाडे यांच्या नेतृत्वात महानगरात 300 बुथवर मंडळ निहाय प्रसारणाची सोय करण्यात आली आहे. बुथवरील सर्व नेते,कार्यकर्ते व सामान्य नागरिक यासेवेचा लाभ घेऊ शकतील.
 प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी 3 ऑक्टोबर 2014 पासुन हा कार्यक्रम घेण्याची सुरवात केली.जनतेसोबत संवाद साधत ते या निमित्ताने भारत सरकारची भूमिका स्पष्ट करतात तर कधी मार्गदर्शनही करतात.जनतेशी संवाद साधताना बरेचवेळा ते देशहितार्थ जनतेचं सहकार्य पण मागतात.अनेकवेळा लोकांच्या सूचनांचे स्वागत करून,त्याची अंमलबजावणीही करतात.जनतेशी सम्पर्क साधण्याचा हा उपक्रम म्हणूनच लोकप्रिय ठरला आहे.सामाजिक उपक्रमाची दखल घेणारा भारतातील उच्चस्तरीय कार्यक्रम म्हणून याकडे बघितले जाते.याला देशातील नागरीकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळेच महानगरातील 300 बुथवर थेट प्रसारण केले जाणार आहे.
महानगरातील मुख्य पदाधिकारी 30 जानेवारीला प्रत्येक बुथवर भाजपा (श) जिल्हाध्यक्ष डॉ मंगेश गुलवाडे यांचेसह दौरा करणार आहेत.प्रत्येक मंडळामध्ये आवश्यक साहीत्य पोहचविण्यात आले असून नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन मन की बात कार्यक्रमाचे संयोजक डॉ दीपक भट्टाचार्य यांनी केले आहे.
विविध विषयांवर जनतेशी पंतप्रधान मोदींचा संवाद

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वच्छ भारत अभियान पासून मन की बात या कार्यक्रमाची सुरुवात केली.या नंतर बेटी बचाव,बेटी पढाव योजना,नोटबंदी,मेक इन इंडिया,व्होकल फॉर लोकल,कोरोना व्हायरस, आत्मनिर्भर भारत,एअर स्ट्राईक,जागतिक योग दिन इ.अश्या शेकडो विषयावर नागरीकांचे लक्ष वेधले हे विशेष.
आ. मुनगंटीवार यांनी केले मार्गदर्शन

मन की बात कार्यक्रम संदर्भात महाराष्ट्राचे लोकनेते, माजी वित्त नियोजन व वनमंत्री तसेच विधीमंडळाच्या लोकलेखा समीतीचे अध्यक्ष आ सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारला दुपारी चार वाजता, ऑडीओ ब्रिज च्या माध्यमातून चंद्रपूर महानगरातील सर्व भाजपा पदाधिकारी, सर्व शक्तीकेंद्र प्रमुख, बुथप्रमुख तसेच बुथप्रभारींसोबत संवाद साधला.या संवाद सेतू मध्ये जवळपास 450 व्यक्ती सहभागी झाले.यावेळी त्यांनी मौलिक मार्गदर्शन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत