नियंत्रण सुटल्यानं दुचाकीची बॅरिकेटला धडक #accident

Bhairav Diwase
दुचाकीस्वार जागीच ठार तर एक जखमी
गोंडपिपरी:- गोंडपिपरी वरून कोठारी मार्गाने जात असलेल्या दुचाकीस्वराचं करंजी हनुमान मंदिरासमोर नियंत्रण सुटल्यानं अपघात झालं. त्यात एक दुचाकीस्वार जागीच मृत्यूमुखी पावला असून एक जण जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय गोंडपिपरी येथे हलविण्यात आले.
मृत्यू पावलेले दुचाकीस्वार हे स्थानिक कोठारीचे माजी उपसरपंच होते. अशी माहिती मिळाली असून सदर अपघातात दोघे दुचाकीस्वार होते. त्यात कोठारीचे माजी उपसरपंच ह्यांच्या रुग्णालयात नेताना मृत्यू झाला असून कोठारी आणि करंजी ग्रामस्तंमध्ये शोकांकाळ पसरली आहे. आणि सदर घटनेचा तपास गोंडपिपरी पोलीस स्टेशन चे ठाणेदार जीवन राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.