Top News

जनसामान्यांच्या मदतीला धावून जाणारे जयंत मामाजी....

लेख संकलन:- भैरव धनराज दिवसे

पोंभुर्णा:- जयंत पिंपळशेंडे पोंभुर्णा तालुक्यात परिचयाचे नाव. जयंत पिंपळशेंडे हे आधार न्युज नेटवर्क चे मुख्य संपादक भैरव दिवसे यांचे मामा.... सात सदस्य असलेल्या चेक आष्टा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत जयंत मामाजी यांनी सलग तीनदा विजयी होत हॅट्रीक साधली. 2020-2021 च्या ग्रामपंचायत निवडणुकीत ते वार्ड क्रमांक 02 मधून निवडणूक लढवली. वार्डातील लोकांच्या संमतीने त्यांच्या विरोधात कुणीही अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे जयंत मामा या निवडणुकीत बिनविरोध विजयी झाले. 2010 ते 2015 या कालावधीत सदस्य होते. 2015 ते 2020 या कालावधीत सरपंच पद भुषविले होते. सध्या 2020 सदस्य म्हणून विजयी झाले आहेत.


2015 च्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जयंत मामाजी यांनी आ. सुधीर मुनगंटीवार माजी मंत्री व जिल्हा परिषद सदस्य राहुल संतोषवार यांच्यावर विश्वास ठेवत भाजपात प्रवेश केला. भाजपात प्रवेश केल्यानंतर त्यांनी 2015 च्या ग्रामपंचायत निवडणुक भाजपा समर्पित पॅनल लढवली होती. त्या निवडणूकीत 03 उमेदवार आणि आपण स्वत: निवडणूकीला सामोर गेले. निवडणूकीत भाजपा पॅनल विजयी झाले. आणि चेक आष्टा ग्रामपंचायतीत भाजपाचा झेंडा फडकला. 2015 च्या ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झाल्यानंतर त्यांनी ग्रामपंचायत सरपंच म्हणून काम केले. 

2015-2020 या कालावधीत चेक आष्टा गावाचा विकास करण्यासाठी सक्रिय काम केले. आ. सुधीर भाऊ मुनगंटीवार माजी अर्थ, नियोजन व वने मंत्री यांच्या नेतृत्वात भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव दादा भोंगळे व जिल्हा परिषद सदस्य राहुल भाऊ संतोषवार यांच्या मार्गदर्शनाखाली चेक आष्टा गावातील रस्त्याच कामे, नालीचे कामे, व्यायाम शाळेच बांधकाम व व्यायाम साहित्य, स्मशानभूमी बांधकाम, शुद्धीकरण यंत्रणा (आरो), जिल्हा परिषद शाळेच बांधकाम, जिल्हा परिषद शाळेसाठी क्रिडा साहित्य, हनुमान मंदिर सभागृह बांधकाम, व सौंदर्यीकरण, 45 घरकुल योजनेचा लाभ, हातपंप (बोअरवेल), 35 इलेक्ट्रीक वाढीव पोल, जयंत पिंपळशेंडे यांनी 05 वर्षाच्या कालावधीत सरपंच पद भुषवितांना असे अनेक प्रकारचे काम या काळात केले. सध्या 2020 सदस्य म्हणून काम करत आहेत.

जयंत मामाजी जनसामान्यांच्या मदतीला धावून जाणारा माणूस, रस्त्यावर गावातील कुणाचा पण अपघात झाला असेल आणि जयंत मामाजीला कुणाचा कॉल आला तर क्षणाचाही विलंब न करता तत्परतेने मदतीला धावून जात. बरेचदा ते रुग्णांसोबत चंद्रपूरला हॉस्पिटलमध्ये जातात... आ. सुधीर भाऊ मुनगंटीवार माजी अर्थ, नियोजन व वने मंत्री यांच्या नेतृत्वात भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव दादा भोंगळे व जिल्हा परिषद सदस्य राहुल भाऊ संतोषवार यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील विकासाला चालना देण्याच काम जयंत मामाजी यांनी केल.... तसेच जिल्हा परिषद सदस्य राहुल संतोषवार यांच्या सोबत आपल्या क्षेत्रात सक्रिय कार्यकर्ता म्हणून काम करत आहेत.

आज २९ जानेवारी....
जयंत मामा यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा....

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने