Click Here...👇👇👇

पुन्हा एकदा दिव्यांग बांधवाच्या हाकेला धावले आ. सुधीर मुनगंटीवार #ballarpur

Bhairav Diwase
बल्लारपूर:- बल्लारपूर येथील आधुनिक बसस्थानकाच्या लोकार्पणाप्रसंगी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी तालुक्यातील २६ दिव्यांग बांधवांना इलेक्ट्रिक बॅटरीवर चालणाऱ्या सायकल भेट दिल्या.
या सायकलच्या माध्यमातुन त्या दिव्यांग बांधवांना प्रवास करण्यासोबतच उपजीविकेसाठी छोटेखानी साधन निर्माण करता यावे. हा त्या मागचा आ. सुधीर मुनगंटीवार यांचा उद्देश होता.
ज्या सव्वीस दिव्यांग बांधवाना त्या दिवशी इलेक्ट्रिक सायकल मिळाल्या यामध्ये शहरातील किल्ला वॉर्ड परिसरात राहणारे मोहम्मद मुस्ताक यासीन शेख यांचाही समावेश आहे.
शेख यांना इलेक्ट्रिक सायकल च्या माध्यमातुन सुधीरभाऊंनी दिलेला आधार निश्चितच त्यांच्यासाठी सुखावह होता. परंतु गेल्या काही दिवसांआधी त्यांच्याकडील इलेक्ट्रिक सायकलच्या बॅटरीत तांत्रिक बिघाड आल्याने त्यांच्या सायकलची चाके थांबली. शेख चिंतेत पडले. परिस्तिथी हलाखीची सोबतच लॉकडाऊनपासून आर्थिक स्थिती दयनीय आहे. अशात नवीन बॅटरी लावणे झेपणारे नव्हते. त्यामुळे शेख यांनी सरळ आ. सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे धाव घेतली. त्यांनी थेट सुधीरभाऊंना फोन करून आपली व्यथा सांगितली.
कर्तव्यनिष्ठ आणि समाजसेवेत सतत कार्यमग्न असलेल्या सुधीरभाऊंनी तात्काळ भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे यांना मोहम्मद मुस्ताक यासीन शेख यांची भेट घेऊन त्यांच्या इलेक्ट्रिक सायकलसाठी लागणारी बॅटरी उपलब्ध करून देण्यासाठी सूचना केल्या. लागलीच आशिष देवतळे यांनी बल्लारपूर येथील आ. सुधीर मुनगंटीवार सेवा केंद्र बल्लारपूरच्या माध्यमातून शेख यांना सायकलसाठी लागणारी बॅटरी उपलब्ध करून दिली.
 यावेळी, सुधीरभाऊंनी केलेल्या या तात्काळ मदतीविषयी आणि त्यांच्या सामान्य जनतेच्या सुखदुःखात उभे राहण्याच्या स्वभावविषयी आपल्या भावना व्यक्त करतांना “जब तक सुधीरभाऊ जैसा मसीहा हम जैसों के साथ हैं, तब तक कयामत भी हमें रुला नहीं सकती” अल्लाह उन्हें लंबी उमर दे असे शब्द भावुक झालेले मोहम्मद मुस्ताक यासीन शेख सहज बोलून गेले.
 याप्रसंगी, भाजयुमोचे जिल्हा महामंत्री मिथिलेश पांडे, जिल्हा उपाध्यक्ष संदीप पोडे सोबत उपस्थित होते.