Click Here...👇👇👇

कोंबड्यांची पैज लावने भोवले; बारा जण अटकेत #brahmapuri

Bhairav Diwase
1 minute read
ब्रम्हपुरी:- वैनगंगा नदीचा पात्रात कोंबड बाजार सूरू होता.अश्यात पोलीसांनी धाड टाकली.कोंबड्यावर पैज लावणाऱ्या बारा जणांना पोलीसांनी ताब्यात घेतले.एक लाखाचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला आहे.ही कार्यवाही ब्रम्हपुरी तालुक्यातील भालेश्वर येथे करण्यात आली.
पोलीसांनी दिलेल्या माहीतीनुसार, ब्रम्हपुरी तालुक्यात येणाऱ्या भालेश्वर येथिल वैनगंगेचा नदी पात्रात अवैध कोंबड बाजार सूरू असल्याची माहीती पोलीसांना मिळाली.पोलीसांनी धाड टाकली असता पैज लावणारे बारा जण पोलीसांचा ताब्यात सापडले. घटनास्थळावरून सहा जखमी कोंबडे, लढाईसाठी वापरण्यात येणाऱ्या लोखंडी कात्या, दुचाकी, सायकल, मोबाईल असा एक लाखाचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला. पुढील तपास ब्रम्हपुरी पोलीस करीत आहेत.