Top News

आ.‌ नाना पटोले यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करा भाजपा ब्रह्मपुरीची मागणी #bramhpuri

त्वरित कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडू भाजयुमो चा आक्रमक इशारा
ब्रम्हपुरी:-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत जाहीरपणे खालच्या स्तराची भाषा वापरल्या प्रकरणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी भारतीय जनता पार्टी ब्रम्हपुरीच्या वतीने करण्यात आली. या बाबत ब्रम्हपुरी विधानसभेचे माजी आमदार प्रा. अतुल देशकर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा ब्रम्हपुरी च्या शिष्टमंडळाने पोलीस निरीक्षक यांना निवेदन सादर करत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्यावर देशद्रोहासह इतर गुन्हे दाखल करून त्वरित कारवाई करण्याची मागणी केली.
भंडारा जिल्हा परिषद निवडणुकीची प्रचार सभा आटोपल्यानंतर नागरिकांसोबत संवाद साधताना नाना पटोले यांनी "मी मोदीला मारू शकतो, त्याला शिव्या देऊ शकतो" अशा पद्धतीचे भाष्य केले. देशाच्या पंतप्रधानांना शिव्या देण्याची, मारण्याची भाषा बोलणं निंदनीय आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मरण्याचा कट काँग्रेस पक्ष रचत आहे हे या पटोले यांच्या वक्तव्यावरून लक्षात येते. काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यां बद्दल अशाच काही भाषेचा वापर केल्याप्रकरणी कॅबिनेट मंत्री नारायण राणे यांना पोलिसांनी अटक केली होती. त्याच पार्श्वभूमीवर त्याच नियमांनी पोलिसांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांना अटक करण्याची मागणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात येत आहे. नाना पटोले यांच्यावर त्वरित कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडू असा आक्रमक इशारा ही भारतीय जनता युवा मोर्चा ब्रम्हपुरीच्या वतीने या वेळी पोलिसांना देण्यात आला.
या प्रसंगी भाजपा ओबीसी आघाडीचे प्रदेश कार्य. सदस्य प्रा. प्रकाश बगमारे, भाजपा शहर महामंत्री तग नगरसेवक मनोज वठे, महामंत्री तथा माजी नगरसेवक मनोज भूपाल, कोषाध्यक्ष अरविंद नंदूरकर, नगरसेवक सागर आमले, माजी शहर अध्यक्ष फकिराजी कुर्वे, माजी अध्यक्ष विलास खरवडे, प्रा. संजय लांबे, साकेत भानारकर, महिला आघाडीच्या जिल्हा सचिव मंजिरी राजणकर, भा.ज.यु.मो जिल्हा सचिव तनय देशकर, शहर महामंत्री रितेश दशमवर, महामंत्री स्वप्नील अलगदेवें, सचिव दत्ता येरावार, उपाध्यक्ष अमित रोकडे, पंकज माकोडे, राहुल सुभेदार, धीरज खेत्रे यांच्या सह भाजपा, भा.ज.यु.मो व महिला आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने