जाहिरात... Advertisement... विज्ञापन

एक वर्ष देशासाठी...... अभाविप ७५ #chandrapur #ABVP 75

चंद्रपूर:- अभाविप ७५ कोवीड काळातील कार्यकर्त्यांचे सेवाकार्य बघून अभाविपवर समाजाचा विश्‍वास अधिक वृध्दींगत झाला आहे. त्यामुळे अनेक कार्यकर्ते आज अभाविपसोबत येण्यास तयार आहेत. त्यांच्यापर्यंत पोहचण्यासाठी आपल्याला अधिक तत्पर व्हावे लागेल. येणारे वर्ष अभाविपसाठी 75 वे आहे. ते साजरे करण्याचे नियोजन झाले असून, 75 नवीन विस्तारकाची घोषणा करायची आहे. एक वर्ष देशासाठी, असा नारा देत येणारा काळ 'अभाविप 75' चा असणार आहे. या काळात प्रत्येक महाविद्यालयात शाखा तयार करून, विद्यार्थ्यांना अभाविपच्या कार्यात सहभागी करू या, असा विश्‍वास विदर्भ प्रांत संघटन मंत्री विक्रमजीत कलाने यांनी व्यक्त केला.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या तीन दिवसीय सुवर्ण जयंती महोत्सवी प्रांत अधिवेशनाचे रविवारी सूप वाजले. शुक्रवारपासून चंद्रपुरातील शंकुतला फॉर्म्स येथे हे अधिवेशन मोठ्या थाटात पार पडले. समारोपाला कलाने मार्गदर्शन करीत होते. यावेळी मंचावर विदर्भ प्रांत अध्यक्ष प्रा. योगेश येनारकर, प्रांत मंत्री अखिलेश भारतीय उपस्थित होते.
कलाने म्हणाले, कोरोना काळात स्वत:च्या जीवाची पर्वा न करता अभाविपच्या कार्यकर्त्यांनी रुग्णांना भोजन, औषधोपचार, अंत्यविधीच्या कार्यात भाग घेतला. यासोबतच मुक्या जनावरांसाठीसुध्दा अन्नाची व्यवस्था केली. या संकटकाळात 'प्रश्‍न तेथे समाधान' अभाविपच्या कार्यकर्त्यांनी दिले. आता अशा संकट काळाचा सामना करण्यासाठी अभाविपचे कार्यकर्ते पूर्णपणे तयार झाले आहेत, सुवर्ण महोत्सवी अधिवेशनाचे नियोजन तीन वर्षापूर्वी करण्यात आले होते. भव्यदिव्य करावे असे कार्यकर्त्यांनी ठरवले होते. पण वेळेवर कोरोनाचे बंधन आले. मात्र, तरीही प्रांत कार्यकारिणी एवढ्या संख्येचे हे अधिवेशन उत्साहात पार पडले. या संकट समयीसुध्दा येथील कार्यकर्त्यांनी अगदी छोट्या-छोट्या गोष्टींचा विचार करून उत्तम व्यवस्था केली. त्यामुळे सर्वांसाठी स्मरणीय असे हे अधिवेशन झाले आहे, असे समाधान कलाने यांनी व्यक्त केले.
अखिलेश भारतीय यांनी, कोरोनाचा काळ लक्षात घेता अभाविपचे आगामी कार्यक्रम, जसे स्वामी विवेकानंद जयंती, 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन, अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्हास्तरावर छोट्या स्वरूपात तसेच आभासी पध्दतीने साजरे करा, असे सांगत जोपर्यंत राज्य सरकार शैक्षणिक कायद्यातील बदल वापस घेत नाही, तोवर अभाविपचा लढा सुरू ठेवेल, असा इशारा दिला. अधिवेशन व्यवस्था प्रमुख प्रवीण गिलबिले यांनी, पूर्व कार्यकर्ते, हितचिंतक, विद्यार्थी कार्यकर्ते, आजी-माजी कार्यकर्ते या सर्वांच्या सहकार्याने हे अधिवेशन अतिशय चांगल्या पध्दतीने पार पडले, असे सांगत अधिवेशनाच्या व्यवस्था समिती सदस्यांचा परिचय करून दिला. संचालन प्रा. योगेश येनारकर यांनी केले. वैयक्तिक गीत वैद्यही मुडपल्लीवार यांनी गायले. वंदे मातरम्ने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाला अभाविपचे पदाधिकारी व विदर्भातील विद्यार्थी कार्यकर्ते उपस्थित होते.
अभाविपची विदर्भ प्रांत कार्यकारिणी घोषित

अधिवेशनात अभाविपच्या विदर्भ प्रांत कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. यात प्रांत अध्यक्ष म्हणून प्रा. योगेश येनारकर (चंद्रपूर) व प्रांत मंत्री अखिलेश भारतीय (भंडारा) यांनी पूनर्नियुक्ती झाली. तर प्रांत उपाध्यक्ष प्रा. डॉ. नितीन गुप्ता (अकोला), प्रांत सहमंत्री अभिषेक देवर (गडचिरोली), राहुल श्यामकुवर (गोंदिया), पायल किनाके (यवतमाळ), अनिकेत पजई (अकोला), प्रांत संघटनमंत्री विक्रमजीत कलाने (नागपूर), प्रांत कार्यालय मंत्री महेश वाघमारे (नागपूर), आशुतोष द्विवेदी (चंद्रपूर), कृतिका राउळ (नागपूर), खुशाल राठोड (अकोला), सुर्यकांत चौधरी (गोंदिया), प्रतिक मेश्राम (नागपूर), पियुष पंचबुध्दे (यवतमाळ), रवी आर्य (वर्धा), अभिषेक गीरीपुंजे (भंडारा) आदींसह सदस्यांच्या नावाचीही घोषणा यावेळी करण्यात आली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत