..... अन् वडिलानेच केला मुलीच्या प्रियकराचा "गेम" #Murder

Bhairav Diwase

वर्धा:- वर्ध्यात मुलीचे प्रेमसंबंधामुळे बदनामीच्या भीतीने बापाने प्रियकराची हत्या केल्याची घटना घडली आहे. अमोल तालन असे या प्रियकराचे नाव आहे. या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे.याप्रकरणी पुलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी बाप फरार झाला आहे.
येसगाव येथे गावातच राहणारा अमोल तालन यांचे प्रेमसंबंध निळकंठ ठाकरे यांच्या मुलीशी होते. मुलीचे गावातील मुलांसोबत प्रेमसंबंध असल्याने समाजात व गावात बदनामी होत असल्याने वडिलांच्या राग अनावर झाला यात त्याने मुलाच्या डोक्यावर काठीने मारहाण केली. या मारहाणीत जखमी अवस्थेत असलेल्या प्रिकराला सेवाग्राम रुग्णालयात उपचारासाठी नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी रात्री 9 वाजताच्या सुमारास घडली आहे.
याप्रकरणी पुलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून निळकंठ ठाकरे फरार झाला असून त्याच्या शोधात पोलिसात पथक रवाना झाले आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक शैलेश शेळके करत आहे.