रविवारपासून पावसाची दमदार सुरुवात
पोंभूर्णा :- पोंभूर्णा तालुक्यात रविवारला रात्री पासून मेघगर्जनेसह पावसाची दमदार सुरुवात झाली असून रात्रभर बुहुतेक ठिकाणी जोरदार व मध्यम दर्जाचा पाऊस सुरू होता. सोमवारला सकाळपासून वादळीवाऱ्यासह दुपारपर्यंत जोरदार पाऊस सुरू होते. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकाचे फार मोठे नुकसान झाले आहे.
हवामान केंद्राने काही दिवसापुर्वी १० आणि ११ जानेवारीला रोजी चंद्रपूर जिल्ह्यासाठी आरेंज आणि येलो अलर्ट जारी केले होते. तालुक्यात ९ जानेवारीलाच रात्रो ८ वाजताच्या दरम्यान पावसाने हजेरी लावली होती. बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला होता.काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलकेसे गारा पडल्या होत्या. विजेचा कडकडाट व मेघगर्जनेसह कमीजास्त प्रमाणात जवळपास रात्रभर हलका ते मध्यम दर्जाचा पाऊस पडत होता.
सोमवारला पहाटे अंदाजे ४ ते ६ पर्यंत थोडी विश्रांती घेत पुन्हा पावसाच्या सरी कोसळल्या. दुपारपर्यंत पाऊस सुरूच होते. या अवकाळी पावसामुळे परिसरातील गहू, हरभरा, लाखोळी, तुर या पिकांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. शेतकऱ्यांना पिकांचे नुकसान झाल्याने आर्थिक फटका बसला आहे. दुसरीकडे ढगाळ वातावरणामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचे पहायला मिळत आहे.
--------------------------------------
शेतीचे नुकसान
तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतपिकाचे मोठे नुकसान झाले आहे.यात उडिद,मुंग, हरभरा,गहू,वटाणा, मका,लाखोडी,मिरची व भाजीपाला आदी पिकाचे पावसामुळे फार मोठे नुकसान झाले आहे. यात शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिगडले आहे. अस्मानी संकटामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.