पद्मश्री सिंधुताईंच्या निधनाने समाज झाला पोरका:- विशाल निंबाळकर #chandrapur

Bhairav Diwase

पद्मश्री सिंधुताईंच्या निधनाने समस्त समाज पोरका झाला आहे. ईश्वरी अंश अनंतात विलीन झाला आहे.यामुळे एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे,जी कधीही भरून निघणारी नाही.

अनाथांची माय हरपली!
👇👇👇👇👇
http://www.adharnewsnetwork.com/2022/01/death.html


वात्सल्यमूर्ती सिंधुताई अन्ननलिकेच्या त्रासामुळे एक महिन्यांपासून उपचार घेत होत्या वयाच्या 75 (14 नोव्हे.1947)व्या वर्षी त्यांची प्राणज्योत हृदयविकाराच्या झटक्याने मालवली.माईंनी प्रचंड कौटुंबिक त्रास सहन करीत त्यांनी अनाथांना सनाथ केले.752 राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार त्यांना मिळाले पण त्यांनी पुरस्कारासाठी काम केलं नाही.4 थी पर्यंत शिक्षण घेऊनही त्यांचं जीवन आपण धडे घ्यावे असेच आहे.अनाथांच्या माई ,अनाथांची माय म्हणून त्यांची ओळख होती.अनाथ व बेवारस मुलांना त्यांनी आधार दिला.आपल्या सामाजिक कार्यातून समाजमनावर संस्कार करणारी महान व्यक्तिमत्व हरपले आहे.ही महाराष्ट्राचीच नाही तर मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा मानणाऱ्या भारतीय समाजाची हानी आहे.

ईश्वर त्यांच्या आत्म्यास सदगती प्रदान करो

भावपूर्ण श्रद्धांजली🙏🙏🙏🙏🙏🙏