दर रविवारी भरणारे "संडे मार्केट'' बंद #close

Bhairav Diwase

(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
चंद्रपूर:- शहरातील आझाद बगीचाजवळ दर रविवारी भरणाऱ्या संडे मार्केटमध्ये होणारी गर्दी लक्षात घेता कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे शासनाने निर्गमित केलेल्या निर्बंधांनुसार दि. ३० जानेवारी २०२२ व ०६ फेब्रुवारी २०२२ रोजी संपूर्णतः बंद ठेवण्यात यावे, असे आदेश मनपा आयुक्त विपीन पालीवाल यांनी दिले आहेत.
मुख्य रस्त्यावर होणारी गर्दी लक्षात घेता काही महिन्यापूर्वी संडे मार्केटवर बंदी घालण्यात आली होती. कोरोनाच्या काळात लाकडाऊन मध्ये हे मार्केट बंद होते. मात्र, टाळेबंदी उठताच पुन्हा संडे मार्केट सुरु झाले. मात्र, कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता शासनाने निर्गमित केलेल्या निर्बंधांनुसार दि. ३० जानेवारी २०२२ व ०६ फेब्रुवारी २०२२ रोजी संपूर्णतः बंद ठेवण्यात यावे, असे आदेश मनपा आयुक्त विपीन पालीवाल यांनी दिले आहेत.