Top News

सेवानिवृत्त भारतीय सैनिक प्रदीप गंधारे यांच्या हस्ते ध्वजारोहण #chandrapur

शहरातील बुरुज क्रं 15 येथे प्रजासत्ताक दिन साजरा
चंद्रपूर:- भारताच्या प्रजासत्ताकात दरवर्षी २६ जानेवारी रोजी या दिवशी देशभरात भारताच्या राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण होऊन त्याला वंदना दिली जाते.भारताचे राष्ट्रगीत म्हटले जाते आणि आदर व्यक्त केला जातो. हा दिवस आपल्या देशातील सुवर्ण दिन आहे.
चंद्रपुर शहरातील हनुमान खिडकी येथील बुरूज क्रमांक 15 वर परिसरातील सामाजिक कार्यात शहरात अग्रेसर असणारी हनुमान मंदिर समिती तर्फे आयोजित भाजयुमो मध्य बाजार मंडळ अध्यक्ष गणेश रामगुंडेवार यांचा नेतृत्वाखाली प्रजासत्ताक दिन ध्वजाचे खरे महत्व जाणणारे भारतीय सैनिक प्रदीप गंधारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलेत.
प्रत्येक व्यक्ती हा सैनिक जरी का होने शक्य नसेल तरी देखील प्रत्येक व्यक्ती हा आपल्या परिसरातील दिन दुबळ्या तसेच गरजू सदस्यांचा अधिकार आणि सुरक्षित ता याचे संरक्षण करणे हे प्रत्येकाचे कर्तव्यच, असे युवा घडण ही काळाची गरज आहेत. बालगोपाल असे उज्वल भारत भविष्य घडवावे असे शुभ मार्गदर्शन प्रदीपजी यांनी केले.
सोबतच परिसरातील बाल गोपालांनी उपस्थितांसमोर प्रजासत्ताक दिनानिमित्त वेशभूषा भाषण पथनाट्य सादर करून मन जिंकण्याचे कार्य केले. बालकलाकारांना प्रोत्साहित असे बक्षीस प्रदीपजी द्वारे देण्यात आले.
मुख्य म्हणजे बाल कलाकारांना खरे हिरो हेच याची जाणीव आज क्षणी मिळाली. परिसरातील चौही बाजूने रॅली द्वारे जयघोष करत लहान मुलामुलींनी तसेच परिसर जेष्ठ यांनी नारे म्हणत जवळील नेताजी सुभाषचंद्र बोस चौक (होकम चौक) येथे भारत मातेच पुजन करण्यात आलेत.
प्रत्येक मुख्य चौकामध्ये प्राची नांदलवार आणि बालकलाकारांनी कोरोना काळात डॉक्टर चे महत्व हा विषयावर पथनाट्य करून जनसमुदायास मोहित केले. या सर्व बाल कलाकारांना प्रोत्साहन रूपी बक्षिस भाजयुमो जिल्हाध्यक्ष, मनपा नगरसेवक विशाल निंबाळकर यांचा द्वारे देण्यात आलेत. प्रजासत्ताक दिना सोबतच प्रत्येक दिवस हा समाजा प्रती असलेली भूमिका सत्य बाजु घेऊन जगून साजरा करूया असे उद्गार उपस्थितांना मिळाले.
प्रत्येक भारतीय नागरिक आपल्या भारत देशाचे काही देने लागतो या विचाराने या दिवशी कोणत्या ही माध्यमातून देश सेवा करण्याची प्रतिज्ञा प्रजासत्ताक दिनी प्रत्येक नागरिकांनी घ्यायला हवी उदारणार्थ गणेश भाऊ रामगुंडेवार यांनी मागील कोरोनाच्या बिकट काळात COV-19 च्या रुग्णा साठी जे 45 दिवस आणि दुसऱ्या टप्प्यात 39 दिवस मरणाला न जुमानता निस्वार्थी पणे भोजनाची, व चाय बिस्कीट नाश्त्याची सेवा दिली,आणि परिसरात सामान्य नागरिकांना हवे त्या क्षणी रक्ताची पुर्तता करून दात्याची भुमिका साठी सदैव तयार असे,त्याला पण देश सेवा म्हंटल्या जाईल देश सेवा ही फक्त सीमेवर राहुन शासकीय सेवेत राहूनच करता येते असे नाही तर ती सेवा करण्याची ईच्छा आकांशा करणारे गणेश भाऊ या मध्ये बघायला मिळते, आपल्यातला सामान्य ही माणुस जगावेगळी कार्य करून सेवा ही बजावता येई याचे उत्तम उदाहरण म्हणजे गणेश भाऊ आहेत म्हणून आम्ही निस्वार्थी होणाऱ्या सेवे मध्ये आमचा सर्वाचा सक्रिय सहभाग हवा,सोबतच मंदिर समितीच्या सामाजिक कार्याची प्रशंसा विशाल निंबाळकर या द्वारे करण्यात आले.
रोशन भाऊ तिवारी,आणि श्री.मुडपलीवारजी यांचे भारत माता पूजन करता सहकार्य लाभले.या सोहळा क्षणी गणेश रासपायले,रवी चहारे,युथ फौंडेशन चे प्रमुख अंकिता देशट्टीवार,पराग दिंडेवार हनुमान मंदिर समिती प्रमुख मोहन मंचलवार,आशिष अलचावार,शैलेश इंगोले,योमेश पेदूरवार,जय निखारे,आकाश लांजेकर,अभी चहारे,दिनेश सेगमवार,योगेश अहिल्यापुरम,सुमित आंबटवार,निखिल कटकमवार,विपीन येंगलवार आदी सदस्यांची उपस्थिती लाभली.
सेवा नाही तर कर्तव्य या भूमिकेतून प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधुन परिसरातील चौही भागांतील 20+ गरजु कुटुंबांना ब्लॅंकेट देऊ करून समाजात प्रजासत्ताक दिन सामाजिक बांधीलकी या नात्याने साजरा व्हावे यासाठीचा सेवाभावी कार्य गणेश रामगुंडेवार तर्फे करण्यात आले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने