भारतीय जनता पक्ष समाजाच्या उन्नतीसाठी झटणारा:- माजी आमदार अँड.संजयभाऊ धोटे #Jivati

Bhairav Diwase
जिवती तालुक्यातील लिंगणडोह येथील नागरिकांचा भाजपात प्रवेश


जिवती:- भारतीय जनता पक्ष हा अंत्योदय हा विचार घेऊन राजकारणात काम करणारा पक्ष आहे,समाजातील शेवटच्या घटकांपर्यत आपण पोहचून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे,भारतीय जनता पक्ष हा समाजाच्या उन्नतीसाठी झटणारा पक्ष आहे. तसेच लिंगणडोह, नोकारी, आसापूर पेद्दाआसापूर या परिसरातील विकासकामांसाठी कटीबद्ध आहोत.
तसेच पेद्दाआसापूर ते लिंगणडोह रस्त्याचे डांबरीकरण करून जिवतीला जाण्यासाठी या परिसरातील नागरिकांना सोयीस्कर झाले असून विकासाच्या मुख्य प्रवाहात या भागातील जनतेला आणण्याचे कार्य भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून झाले आहे असे प्रतिपादन राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार अँड.संजयभाऊ धोटे यांनी केले. यावेळी ते लिंगणडोह व परिसरातील नागरिकांच्या पक्षप्रवेशाप्रसंगी बोलत होते.
यावेळी मंचावर माजी आमदार अँड.संजय धोटे,भाजपा नेते अजय दुबे,जेष्ठ नेते सुरेश केंद्रे,उपसभापती तथा भाजयुमो महामंत्री महेश देवकते,भाजयुमो महामंत्री मिथिलेश पांडे, गडचांदूर शहर अध्यक्ष सतीश उपलंचेवार,निलेश ताजने,भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने,गोपीनाथ चव्हाण,येमले, राजेश राठोड उपस्थित होते.


          लिंगणडोह,नोकारी,आसापूर, येथील पुरुष, महिला व युवकांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश घेतला. यावेळी लिंगणडोह येथील अनेक नागरिकांनी माजी आमदार अँड.संजय धोटे यांच्या नेतृत्वात प्रवेश घेतला.
        
         यावेळी संतोष राठोड,उत्तम पवार,विजय चव्हाण,प्रवीण आडे,किसन पवार,संतोष पवार,बाबू पवार,व्यंकटी राठोड,विठ्ठल राठोड, शिवराम आडे,गोविंद आडे,शामराव पवार,शंकर आडे यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश घेतला.तसेच यावेळी गावातील पुरुष व महिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.