जाहिरात... Advertisement... विज्ञापन

व्याहाड खुर्द परिसरात चोरट्यांची टोळी सक्रिय #saoli #saolinews

(आधार न्युज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) सौरभ चौधरी, सावली
सावली:- सावली पोलीस ठाण्याअंतर्गत व्याहाड खुर्द,सोनापूर परिसरात चोरट्यांची टोळी सक्रिय झाली असून,या टोळीने गेल्या काही दिवसात अनेक दुकाने फोडून रोख रकमेसह माल लंपास केल्याने परिसरात दहशत परसली आहे. ३० डिसेंबरच्या रात्री व्याहाड खुर्द येथील तीन दुकाने फोडून चोरट्यांनी माल पळविला. हे चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाले आहे.
तसेच सोनापूर येथील चिंतलवार यांच्या किराणा दुकानात चोरी, व्याहाड खुर्द येथिल आशिष पुण्यपवार यांच्या हार्डवेअर दुकानातून ८ हजार रुपये रोख, शुभम डोमळे यांच्या सोने चांदीच्या दुकानातून चौदाशे रुपयांचे चांदीचे साहित्य, महेश बोबाटे यांच्या भांड्याच्या दुकानातून एक हजार रुपये रोख चोरट्यांनी चोरून नेले. याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून, या चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत