भाजपाला दे धक्का...... #BJP #congress #pombhurna

Bhairav Diwase
भाजपा प्रसिद्धी प्रमुखाने धरला कांग्रेसचा हाथ

तालुक्यात खळबळ

दुय्यम दर्जाच्या वागणुकीमुळे घेतला काडीमोड

पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या मार्गदर्शनाखाली कांग्रेसमध्ये प्रवेश
पोंभूर्णा:- माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी सढळ हाताने विकास निधी देऊन पोंभूर्णा शहराचा कायापालट केला नव्हे विकासगंगा खेचून आणत पोंभूर्ण्याचा चेहरा मोहरा बदलवून टाकले असतांना भाजपाचे खंदे समर्थक असलेल्या प्रसिद्धी प्रमुखाने भाजपा पक्षातून काडीमोड घेत कांग्रेसमध्ये प्रवेश घेतला.यामुळे भाजपाला मोठा धक्का बसला असून भाजपातील नाराजी या निमित्ताने चव्हाट्यावर आली. भाजपातील कार्यकर्त्यांचा असंतोष येणाऱ्या निवडणुकीत भाजपाला धोक्याचे असल्याचे चित्र दिसत आहे.

पोंभूर्ण्याचा विकास सुधीर मुनगंटीवार यांनी याची देही याची डोळा करून ठेवला. म्हणूनच पहिल्या नगरपंचायतच्या निवडणुकीत भाजपाला एकहाती सत्ता मिळाली. स्वर्गीय गजानन गोरंटीवारनी मुनगंटीवार यांच्याकडून सर्वाधीक निधी मिळवून अनेक हितैषी काम करून घेतले.पोंभूर्ण्यात भाजपाला दुसरा पर्याय नव्हता मात्र गजानन गोरंटीवारच्या जाण्यामुळे भाजपाची पोकळी निर्माण झाली. भाजपाने तालुक्याची कमान पर्यायी व्यवस्था म्हणून केली असल्याने नाराजी सुरू झाली. आणि भाजपात बंडाची लाट सुरू झाली.नाराजी एवढी वाढली की भाजपाचे तालूका प्रसिद्धी प्रमुख दिलीप मॅकलवार,माजी नगरपंचायतच्या सभापती सुनीता मॅकलवार,माजी भाजपा महिला आघाडीच्या तालुका अध्यक्षा आशा गुडेपवार यांनी नागपूरात चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली कांग्रेसचा हाथ घेऊन पक्ष प्रवेश केला. यामुळे भाजपात मोठी खळबळ माजली असून यामुळे माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या बालेकिल्ल्याला मोठा धक्का बसला आहे. भाजपाने पोंभूर्ण्यातील नेतृत्वार विचारमंथन करण्याची वेळ आली असल्याची ओरड आता पक्षातून केली जात आहे.

भाजपात दुय्यम स्थान म्हणून नाराजी

वीस वर्षांपासून भाजप पक्षात एकनिष्ठ राहून पक्षाचे काम करतांना दिलीप मॅकलवार यांनी तालूका प्रसिद्धी प्रमुखाची समर्थपणे धुरा सांभाळली असतांना स्थानीक पदाधिकाऱ्यांकडून नेहमीच दुय्यम वागणूक दिल्या गेली.यामुळेच भाजप पक्षातून काडीमोड घेत काँग्रेस पक्षावर विश्र्वास ठेवून पक्ष प्रवेश केला आहे.

भाजपा पदाधिकारी म्हणतात संधीसाधूपणा

भाजपा पक्षाने नेहमीच आपल्या कार्यरत्यांना महत्वाचे स्थान दिले आहे. मात्र अनेकांना निवडणूकीत तिकीट देणे शक्य नसते ज्यांनी भाजपा पक्ष सोडलेला आहे.त्यांनी टिकीट न मिळाल्याने गेले आहेत.यामध्ये फक्त संधीसाधूपणा दिसत असल्याचे भाजपा नेत्यांचे म्हणणे आहे. यामुळे पक्षात कोणताही फरक पडणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

कर्तव्यनिष्ठ कार्यकर्ते गमावले

पोंभूर्णा नगरपंचायतच्या माजी सभापती तथा भाजपा महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्ष सुनीता मॅकलवार यांनी आपल्या कार्यकाळात स्वच्छतेसंबधी अनेक हितैषी काम केले.अनेक सामाजीक कार्यात हिरीरीने भाग घेतला.आणि पोंभूर्ण्याचे नाव दिल्लीला नेऊन पोहचवले असतांना भाजपाने त्यांच्या अनुभव व एकनिष्ठतेला दुय्यम दर्जा देऊन सावत्र वागणूक दिल्याने एक स्वच्छ प्रतिमेची कार्यकर्ती भाजपाने गमावली.