Click Here...👇👇👇

ट्रान्सफॉर्मरच्या अँगलला गळफास घेऊन आत्महत्या #suicide

Bhairav Diwase
(आधार न्युज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) सौरभ चौधरी, सावली
सावली:- तालुक्यातील लोंढोली येथील रघुनाथ पांडुरंग गेडाम वय 63 वर्ष यांनी जाम-केरोडा रोड वरील साईबाबा राईस मिल च्या मागील बाजूच्या शेतातील इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर च्या अँगल ला दुपट्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. मृतक हा आजराने ग्रस्त होता. अशी माहिती पोलिसांना तक्रारी मध्ये देण्यात आली.
मात्र त्यांच्या परिवारातील सदस्याने पोलिसांना दिलेल्या माहिती प्रणाने हा तो अनेक दिवसांपासून आजारी होता. आजार पणाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली असल्याचा सांगण्यात येत आहे. या बाबत सावली पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यावरून सावली पोलिसांनी मार्ग दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे.