जाहिरात... Advertisement... विज्ञापन

.... तर मुख्यमंत्री पश्चिम बंगालसारखा निर्णय घेतील. #Maharashtra

वाढत्या रुग्णसंख्येवरुन ना. विजय वडेट्टीवार यांचा इशारा
मुंबई:- राज्यात रुग्ण वाढले तर पश्चिम बंगालसारखा निर्णय घ्यावा लागेल. तसेच पश्चिम बंगालप्रमाणे निर्बंध महाराष्ट्रात लागू शकतात असा इशारा राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे.
शाळा, कॉलेज आणि लोकलसंदर्भात मुख्यमंत्री निर्णय घेतील असेही वडेट्टीवार म्हणाले. सुरुवातीला कंटेन्मेंट झोनमध्ये निर्बंध लागण्याची शक्यता आहे. मंत्रीमंडळाच्या बैठकीत यासंदर्भात चर्चा होणार असल्याचे वडेट्टीवार म्हणाले.
विजय वडेट्टीवार म्हणाले की, पश्चिम बंगालमध्ये शाळा, कॉलेज बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. जर महाराष्ट्रात रुग्णसंख्या वाढली तर तीच स्थिती इथे निर्माण होईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चाही झाली आहे. ते निर्बंधाबाबत निर्णय घेतील. यात एक पर्याय म्हणजे राज्यात काही ठिकाणी कन्टेन्मेंट झोन करुन तिथे प्रवेश बंदी केली जाईल. गर्दी होणार नाही त्याची दक्षता घेण्यात येईल. रेल्वेत जी गर्दी होतेय त्यावरही मुख्यमंत्री गंभीर आहेत. कॅबिनेट आणि टास्कफोर्सच्या बैठकीत यावर चर्चा होईल. निर्णय होणे अपेक्षित आहे अशी माहिती त्यांनी दिली.
"१५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण हे विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी आनंदाची बाब आहे. करोनाच्या तिसऱ्या लाटेने प्रवेश केला आहे. महाराष्ट्रातही रुग्णसंख्या वाढत आहे. १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण करण्यासाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे," अशी प्रतिक्रिया विजय वडेट्टीवार यांनी टीव्ही९ सोबत बोलताना दिली. #साभार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत