Click Here...👇👇👇

उसरपार तुकुम शाळेतील मद्यपी शिक्षक निलंबित #saoli

Bhairav Diwase
(आधार न्युज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) सौरभ चौधरी, सावली
सावली:- तालुक्यातील उसरपार तुकूम येथील शिक्षक दिलीप ढोक हे शालेय वेळेत शिक्षक मद्यधुंद अवस्थेत राहत असल्याची पालकांची तक्रार व पंचायत समिती सभापती विजय कोरेवार यांच्या भेटीतही शिक्षक मद्यधुंद अवस्थेत आढळल्याने संबंधित शिक्षकाची पाथरी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्यात आली होती. 
शिक्षकाच्या वैद्यकीय तपासणीनंतर गुन्हा दाखल करून कारवाईचा प्रस्ताव जिल्हा परिषदेला सादर करण्यात आला. प्रकरणाची दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी मिताली सेठी यांनी दिलीप ढोक यांना निलंबित केले आहे. उसरपार तुकुम येथील जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक दिलीप ढोक हे नेहमी दारू पिऊन येत असल्याने पालकांनी अनेकदा तक्रारी केल्या होत्या. तक्रारीची दखल घेत सावली पंचायत समितीचे सभापती विजय कोरेवार यांनी अचानक शाळेत भेट दिली मुख्याध्यापक दारू पिऊन आढळले.
शिक्षणासारख्या पवित्र कार्यात दारू पिऊन राहणे ही गंभीर बाब आहे. असाच प्रकार केशरवाही शाळेत चालत असून, येथील शिक्षक रजनीकांत गेडाम व कर्तव्यात कसूर करणाऱ्या इतर शिक्षकांचा प्रस्तावही जिल्हा परिषदेला पाठविला आहे. त्यांच्यावरही योग्य ती कारवाई केली जाईल.
विजय कोरेवार
सभापती पं. स. सावली