Top News

वर्धा-बल्लारशाह-वर्धा मेमू ट्रेनचे जल्लोषात स्वागत #Ballarpur


बल्लारशहा-वर्धा मेमू ट्रेन सुरू करून प्रवाशांना एक भेट दिली आहे. या गाडीचे आज बल्लारशाह रेल्वे स्थानकावर जल्लोषात स्वागत करण्यात आले. कोरोना संकटापूर्वी बल्लारशाह ते भुसावळ अशी पॅसेंजर ट्रेन धावत होती, ती बंद पडल्याने प्रवाशांना या मार्गावर प्रवास करताना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर, आमदार सुधीर मुनगंटीवार आणि ZRUCC, DRUCC सदस्य, चंद्रपूर जिल्हा रेल्वे प्रवासी संघ बल्लारशाहने प्रवाशांची होणारी गैरसोय वारंवार निदर्शनास आणून दिल्यानंतर आजपासून ही नवीन विशेष गाडी सुरू झाली आहे. ही गाडी सुरू झाल्याने नियमित प्रवास करणारे कामगार, विद्यार्थी, छोटे व्यापारी, बल्लारशाह ते वर्धा प्रवास करणारे ग्रामस्थ यांची मोठी सोय होणार आहे.
यावेळी महाराष्ट्र वनविकास महामंडळाचे माजी अध्यक्ष तथा भाजपचे ज्येष्ठ नेते चंदनसिंह चंदेल, ZRUCC सदस्य श्रीनिवास सुंचुवार, DRUCC सदस्य विकास राजूरकर आदी उपस्थित होते. यावेळी रेल्वे चालक व टीटी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले व मिठाई वाटण्यात आली. सध्या चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रेल्वे प्रवासी असे आहेत.
यावेळी महाराष्ट्र वनविकास महामंडळाचे माजी अध्यक्ष तथा भाजपचे ज्येष्ठ नेते चंदनसिंह चंदेल, नगराध्यक्ष हरीश शर्मा, ZRUCC सदस्य श्रीनिवास सुंचुवार, DRUCC सदस्य विकास राजूरकर आदी उपस्थित होते. यावेळी रेल्वे चालक व टीटी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले व मिठाई वाटण्यात आली. सध्या चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रेल्वे प्रवासी असे आहेत. बल्लारशाहचे सदस्य गणेश सैदाने, शिवचंद दिवेदी, रामेश्वर पासवान, देवा वाटकर, शेखर श्रीवास्तव , विनायक साल्वे,संजू कोडशेट्टी, राजेश कैथवास, भास्कर पेंडोर, अरविंद वर्मा, नितेश नायडू, संतोष दीक्षित, ट्रैफिक इंस्पेक्टर उमाकांत दास, कमर्शियल इंस्पेक्टर कृष्ण कुमार सेन, वेंकटेश्वरलू, लोको पायलट एनपी पड़वाला , रविकांत मिश्रा आदि उपस्थित होते

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने