जाहिरात... Advertisement... विज्ञापन

वीज खांबावरच लोंबकळत राहिला मृतदेह #death


संग्रहित छायाचित्र


(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
नागभीड:- खंडीत झालेला वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी खांबावर चढलेल्या तरूणाचा तारांचा स्पर्श झाल्याने मृत्यू झाल्याची घटना नागभीड तालुक्यात घडली. रोशन पुंडलीक पाथोडे असे मृतकाचे नाव आहे. जवळपास अर्धा तास त्याचा मृतदेह खांबावारच लटकलेल्या स्थितीत राहिला.
सविस्तर वृत्त असे की, नागभिड तालुक्यातील बोथली येथील हा तरूण वीज दुरुस्तीची कामे करायचा. चिखलपरसोडी येथे एका घरातील खंडीत झालेला विद्युत पुरवठा पूर्ववत करण्यासाठी पुंडलीक गेला होता. मुख्य विद्युत लाईनचा पुरवठा खंडित न करता तो खांबावर चढला. दरम्यान, जिवंत विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने त्याला जोरदार धक्का बसला. यात त्याचा मृत्यू झाला.
त्याचा देह खांबावरच लटकत होता. घटना लक्षात येताच गावकरी धावून आलेत. महावितरण, पोलीस विभागाला घटनेची माहीती देण्यात आली. मृतदेह खांबावरून उतरवण्यात आला. उपचारासाठी पुंडलीकला नागभिड ग्रामीण रूग्णालयात हलविण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. या दुदैवी घटनेने बोथली गावात शोककळा पसरली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत