चंद्रपूर:- राज्यात मुसळधार पावसाचा धुमाकूळ सुरू असून चंद्रपूर जिल्ह्यात पूरपरिस्थिती गंभीर झाली आहे. मुसळधार पावसामुळे वर्धा नदीच्या पाणीपातळीत प्रचंड वाढ झाली आहे. परिणामी, महाराष्ट्र आणि तेलंगणाला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा असलेला बल्लारपूर-राजुरा मार्ग पूर्णपणे बंद करण्यात आला आहे.
नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. पुलाच्या दोन्ही बाजूंना मालवाहू ट्रक आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. स्थानिक प्रशासनाने तातडीची पावले उचलत नदीकाठावरील सर्व गावांना सतर्कतेचा इशारा (High Alert) दिला आहे

