राजुरा:- बिरसा मुंडा नगर परिसरात दहावीत शिकणाऱ्या एका 16 वर्षीय विद्यार्थिनीने स्वतःच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ऋतुजा सचिन कुकडे असे या दुर्दैवी मुलीचे नाव असून, या घटनेमुळे संपूर्ण राजुरा शहरात तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली. घटनेच्या वेळी ऋतुजाचा आठ वर्षांचा लहान भाऊ घरात उपस्थित होता. ऋतुजाची आई पोलीस विभागात तर वडील तलाठी म्हणून कार्यरत आहेत. कुकडे कुटुंब हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथील रहिवासी आहे. अत्यंत हसतमुख आणि अभ्यासू असलेल्या ऋतुजाने एवढे टोकाचे पाऊल का उचलले, याचे निश्चित कारण अद्याप समोर आलेले नाही.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून, या प्रकरणी पुढील तपास राजुरा पोलीस करत आहेत.

