Education Minister: प्रधान गेले जोशी आले! प्रल्हाद जोशी नवे केंद्रीय शिक्षणमंत्री

Bhairav Diwase

नवी दिल्ली:- निट पेपर फुटी प्रकरण भाजप नेते धर्मेंद्र प्रधान यांना भोवलं आहे. शेवटी त्यांना आपल्या शिक्षण मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. त्यांच्या रिक्त झालेल्या पदाची अतिरीक्त जबाबदारी आता प्रल्हाद जोशी यांच्याकडे देण्यात आली आहे.


त्यांच्यावर नव्या शिक्षणमंत्रिपदाची जबाबदारी असणार आहे. संसदेत काँग्रेसने धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती. त्यामुळे अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात एक दिवस ही कामकाज होवू शकले नाही. तर रस्त्यावर सीजेपीने सरकारची कोंडी केली होती. शेवटी या तीव्र संघर्षानंतर धर्मेंद्र प्रधान यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला.


धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर केंद्र सरकारने प्रल्हाद जोशी यांची नवे शिक्षणमंत्री म्हणून नियुक्ती केली आहे. जोशी यांच्याकडे सध्या अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्रालयाचाही कार्यभार आहे.