पोंभुर्णा:- पोंभुर्णा येथील चिंतामणी कॉलेज ऑफ सायन्सच्या प्राध्यापिका वर्षा टेकदास शेवटे यांना गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली तर्फे आचार्य (Ph.D.) पदवी प्रदान करण्यात आली आहे.
वर्षा शेवटे यांनी आपले हे संशोधन चिंतामणी सायन्स कॉलेजचे प्रा. डॉ. सुधीर हूंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केले. त्यांनी त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल चिंतामणी शिक्षण संस्थेचे संचालक स्वप्निल दोन्तुलवार, प्रशांत दोन्तुलवार, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजीव वेगिनवार, अनुप एकरे यांच्यासह सर्व प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन करत सत्कार केला. प्रा. शेवटे यांच्या या यशाबद्दल शैक्षणिक वर्तुळातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

