सिंदेवाही:- कोविड लसीकरणाचे मानधन प्रलंबित असल्यामुळे सिंदेवाही तालुक्यातील संगणक परीचालक संघटना सदर चे काम बंद करत असलेल्या बाबतचे निवेदन सोमवार दिनांक 17 जानेवारीला आरोग्य अधिकारी सिंदेवाही यांना दिले आहे.
सविस्तर वृत्त असे की, सर्व ग्रामपंचायत आपरेटर मे महिन्यापासून कोविड लसीकरणाचे काम करीत आहेत. सदर कामाचे मानधन नियमित देण्याचे सांगण्यात आले होते. परंतु माहे ऑक्टोंबर 2021 पासून लसीकरणाचे मानधन मिळाले नाही, तसेच संगणक परिचालक ने थकीत मानधनाबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडे वारंवार विचारणा केली असता त्यांना आरोग्य अधिकारी यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे उत्तर प्राप्त झाले नाही. त्यामुळे जोपर्यंत संगणक परिचालकला चालू कामाचे मानधन मिळणार नाही, तोपर्यंत ते कोणतेही लसीकरणाची शेसन करणार नाही अशा बाबत निवेदन तालुका आरोग्य अधिकारी यांना देण्यात आले.