Top News

पंतप्रधानाबाबत आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष आ. पटोलेंचा भाजयुमो तर्फे जाहीर निषेध:- विशाल निबाळकर #chandrapur



(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल
थोरात
चंद्रपूर:- काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांनी भंडारा जिल्ह्यात प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद मोदी यांच्याबद्दल अतिशय खालच्या स्तरावर जाऊन टिका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कर्तुत्वाच्या उंची समोर नाना पटोले पासंगालाही पुरणार नाही. एका राष्ट्रीय पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष कडुन यापद्धतीचे बेताल वक्तव्य करत त्यांनी त्यांच्या पक्षाची संस्कृती दखविली आहे. भाजयुमो जिल्हाध्यक्ष विशाल निंबाळकर यांनी प्रतिक्रीया देतांना सांगितले की, पंतप्रधान हे कोणत्याही एका पक्षाचे नाही तर ते संपुर्ण देशाचे पंतप्रधान असतात. अश्या उच्च संवैधानिक पदावर असणाऱ्या व्यक्ती संदर्भात आक्षेपार्य विधान करणे हे नाना पटोले व काॅंग्रेस पक्षाच्या संस्कृतिला शोभणारे नसुन त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो असे त्यांनी त्यावेळी सांगितले.
प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांच्या वक्तव्याबद्दल समाजातील सर्व स्तरावरून टिका होत आहे. त्यांच्या या विधानाचा भारतीय जनता युवा मोर्चा महानगर चंद्रपुर तर्फे घोषणाबाजी व आ. नाना पटोले यांच्या फोटो असलेल्या बॅनरला चप्पल व जोड्याने मारून जाहीर निषेध करण्यात आले.
लोकलेखा समिती प्रमुख तथा माजी मंत्री आ. व सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या मार्गदर्शनात भाजपा महानगर अध्यक्ष डाॅ. मंगेश गुलवाडे व भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विशाल निंबाळकर यांच्या नेतृत्वात पडोली पोलीस स्टेशन रामनगर व सिटी पोलीस स्टेशन येथे निवेदन देऊन आ. नाना पटोले वर एफ.आय.आर. दाखल करून अटकेची मागणी करण्यात आली.
यावेळी प्रज्वंलत कडु (महामंत्री), सचिन कोतपल्लीवार (बाजार मंडळ अध्यक्ष), गणेश रामगुंडेवार , संजय पटले, गजानन भोयर, उपाध्यक्ष राहुल पाल, रूपेश चहारे, रामनारायन रविदास, आकाश मस्के, यश बांगडे, सचिव आकाश ठुसे, प्रणय डंबारे, धनंजय मुफकलवार, विशाल गिरि, शिवम कपुर, गणेष रासपायले, रोहीत भिसेकर, विक्की मेश्राम, श्याम बोबडे, हरिश मात्रे, रोहन चालेकर, स्वप्नील भोपये, मनोज उगेमुगे, विपीन निंबाळकर, राहुल कांबळे, सौरव मेश्राम, रूपेश कैवास उपस्थीत होती.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने