महिला पोलिस शिपायाची आत्महत्या #suicide

Bhairav Diwase
(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
गडचिरोली:- गडचिरोली पोलिस वसाहतीत राहत असलेल्या महिला पोलिस शिपायाने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. शनिवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
प्रणाली काटकर (वय ३५) असे मृत महिला पोलिस शिपायाचे नाव आहे. मृत महिला पोलिस शिपाई प्रणाली काटकर गडचिरोली मुख्यालयात दोन वर्षांपासून कार्यरत होत्या. त्यांचे लग्नही पोलिस शिपाई संदीप पराते यांच्याशी दोन वर्षांपूर्वी झाले होते. ते सुद्धा गडचिरोली मुख्यालयात कार्यरत आहेत. विशेष म्हणजे प्रणाली काटकर या संदीप पराते यांच्या दुसऱ्या पत्नी होत्या. या दोघांत सातत्याने वाद व्हायचे. शनिवारी देखील दोघांमध्ये वाद झाला. वाद विकोपाला गेल्यानं प्रणाली काटकर यांनी टोकाची भूमिका घेऊन विष प्राशन केले. त्यांनी विष प्राशन केल्याचे लक्षात येताच पती संदीप पराते यांनी त्यांना लगेच जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले.
मात्र, रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक अरविंदकुमार कतलाम यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक पूनम गोर्हे करत आहेत.