💻

💻

भारत पुन्हा एकदा अंडर 19 क्रिकेटमध्ये वर्ल्ड चॅम्पियन #U19WorldCupchampions

यश धुलच्या संघाने रचला इतिहास, फायनलमध्ये इंग्लंडला हरवलं
भारताचा युवा संघ पुन्हा एकदा अंडर 19 क्रिकेटमध्ये वर्ल्ड चॅम्पियन बनला आहे. अँटिंग्वाच्या सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात यश धुलच्य़ा नेतृत्वाखाली खेळणाऱ्या अंडर 19 टीमने इंग्लंडचा चार विकेट आणि 14 चेंडू राखून पराभव केला.

विकेटकिपर दिनेश बानाने षटकार ठोकून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. इंग्लंडने भारतासमोर विजयासाठी 190 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. भारताच्या युवा टीमने कुठलाही धोका न पत्करता संयमाने फलंदाजी करत हे लक्ष्य पार केलं. सामन्यात एकवेळ भारताची चार बाद 97 अशी स्थिती होती. त्यावेळी ऑलराऊंडर निशांत सिंधु आणि राज बावाने पाचव्या विकेटसाठी 67 धावांची महत्त्वाची भागीदारी केली. निशांत सिंधू (50) धावांवर नाबाद राहिला, तर राज बावाने (35) धावा केल्या. आजच्या सामन्याचा नायक ठरला तो राज बावा पाच विकेट आणि 35 धावा अशी अष्टपैलू कामगिरी त्याने केली.
त्या समयी डाव गडगडतो की, काय अशी शंका निर्माण झाली होती

भारताच्या डावाची सुरुवात चांगली झाली नाही. डावखुरा वेगवान गोलंदाज जोशुआ बोयडनने इंग्लंडला पहिलं यश मिळवून दिलं. अंगकृष रघुवंशीला शून्यावर बाद केलं. पण त्यानंतर हरनूर सिंग आणि शेख रशीदने सावध, सयमी फलंदाजी करुन इंग्लंडला यश मिळणार नाही याची काळची घेतली. त्यांनी दुसऱ्या विकेटसाठी 49 धावा जोडल्या. थॉमस एसपिनवॉल गोलंदाजीवर 21 धावांवर खेळणाऱ्या हरनूरचा विकेटकिपरने सूर मारुन अप्रतिम झेल घेतला. त्यानंतर शेख रशीद आणि कॅप्टन यश धुलने डाव सावरला. रशीद अर्धशतक झळकावल्यानंतर मोठा फटका खेळण्याच्या नादात सेल्सच्या गोलंदाजीवर बाद झाला. पाठोपाठ यश धुलही सेल्सच्या गोलंदाजीवर 17 धावांवर आऊट झाला. त्या समयी डाव गडगडतो की, काय अशी शंका निर्माण झाली होती. पण निशांत सिंधु आणि राज बावाने पाचव्या विकेटसाठी 67 धावांची महत्त्वाची भागीदारी केली. राज बावा आणि कौशल तांबे बाद झाल्यानंतर दिनेश बाना आणि निशांत सिंधुने भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.
रवी कुमार-राज बावाची भेदक गोलंदाजी

ICC अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेच्या फायनलमध्ये भारताच्या वेगवान गोलंदाजीसमोर इंग्लंडच्या टीमचा निभाव लागला नाही. राज अंगद बावा आणि रवी कुमारच्या भेदक गोलंदाजीच्या बळावर भारताने इंग्लंडला अवघ्या 189 धावांवर रोखलं. अँटिंगामध्ये सुरु असलेल्या या सामन्यात इंग्लंडची टॉप आणि मीडल ऑर्डर पूर्णपणे अपयशी ठरली. जेम्स रियूने 95 धावांची शानदार खेळी केली. 34 धावांवर नाबाद असलेल्या जेम्स सेल्सने त्याला चांगली साथ दिली. दोघांनी आठव्या विकेटसाठी 93 धावांची भागीदारी केली. या भागीदारीमुळेच इंग्लंडचा संघ 189 धावसंख्येपर्यंत पोहोचला. अन्यथा इंग्लंडचा डाव खूप आधीच आटोपला असता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत