💻

💻

आईने सुपारी देत घडवून आणली मुलीची हत्या

(आधार न्युज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) जगत सिंग वधावन, राजुरा
राजुरा:- पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काही दिवसापूर्वी दि. 18 फेब्रुवारीला दुपारच्या 3 वाजताच्या सुमारास कविटपेठ शिवारातील अर्जुन आत्राम यांच्या शेतातील विहीरीत मृत अवस्थेत शव मिळाले असता गावकऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. लगेच ठाणेदार व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले व मृत शव ला बाहेर काढण्यात आले. मृत व्यक्तीचे पुरावे नसल्यामुळे नातेवाईकांची ओळख मिळाली नव्हती. विरुर पोलिसांनी मृत व्यक्तीची ओळख पटण्याकरीता सोशल मीडियावर आवाहन केले. तेलंगाना व आंध्र प्रदेश या ठिकाणी सुद्धा फोटोची माहिती पोहोचण्यात आली असता कोंडापल्ली विजयवाडा आंध्रप्रदेश येथील सौदा बघावत यांच्या कडून पत्ता लागला असता मृत महिलेची आईला विरूर ला बोलावून मृत महिलेचे शव विच्छेदन करण्यात आले व माहिती नुसार अहवालात सदर मृत महिला गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले होते.
परंतु महिलेचे मृत्यूचे कारण स्पष्ट झाले नाही नंतर चिनू अजमेरा राहणार मुंडीगेट हे मृत महिलेचे नातेवाईक आहे. अशे माहिती मिळाली व कॉल रेकॉर्ड चेक केल्या नंतर माहिती मिळाली की मृत्यू चे दिवशी चींनु अजमेरा मुंडिगेट इथे हजर होता. नंतर चिंनु अजमेरा यांना हैदराबाद इथून आणून विचारपूस केल्यानंतर त्याने गुन्हा कबूल केले की मृत्त महिलाचे चरित्र खराब असल्यामुळे तिच्या आईने 30 हजाराची सुपारी देऊन खून करण्यात सांगितले होते. चिंनू अजमेरा यांनी बायान मध्ये सांगितले की एका लग्नामध्ये मृत्त महिला व तिची आई यांची भेट 14 फेब्रुवारी ला झाली होती आणि लग्नामध्ये तिच्या आईने चिनुला सांगितले माझी मुलगी चरित्रहीन आहे. त्याच्यामुळे माझी बदनामी होत आहे, त्यासाठी तुम्ही तिला तुमच्या परिसरात घेऊन जावा आणि गर्भ पेशी खाली करायची आहे म्हणून तिला नेऊन मारून टाका म्हणून 30 हजाराची सुपारी दिली. 5 हजार नगदी दिले व बाकी दोन चार दिवसात देतो असे सांगितले व कुणाच्या हाती सबुत नाही मिळाले पाहिजे असे पण सांगितले असता कविटपेठ येथे चिनू अजमेरा व तिची पत्नी शारदा मृत महिलेला घेऊन विहिरीजवळील पाणी काढायला सांगितले.
      दरम्यान चिनुच्या पत्नीने शारदा ने तिला धक्का देऊन विहिरीत ढकलले. तिचा मृत्यू झाल्यानंतर तो चींनू हैदराबादला निघून गेला. पत्नी शारदा ही मुंडिगेत ला निवासी थांबली. सदर तपासात आरोपी चिनू अजमेरा वय 30 वर्ष, सौ शारदा चिनू अजमेरा 25 वर्ष दोघेही राहणार मुंडेगेट, लक्ष्मी भीमा बगावत वय 50 वर्ष. राहणार कोंडापल्ली विजयवाडा. आंध्र प्रदेश या तिघांना अटक करण्यात आले.
     
    विरूर  पोलिसांना कोणतेही पुरावे नसतानाही  आरोपींना पकडण्यात यश मिळवले पोलीस स्टेशनचे ठाणेदार राहुल चव्हाण यांच्या मार्गदर्शनात हवालदार दिवाकर पवार हवालदार माणिक वाघद रकर हवालदार मल्लेश नरगेवार शिपाई विजू मुंडे. सुरेंद्र काळे. सविता गोनेल वार. भगवान मुंडे. लक्ष्मीकांत खंडारे. अशोक मडा वी. प्रमोद मिलमिले. अतुल सहारे. ममता गेडाम यांनी पार पाडली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत