Click Here...👇👇👇

मित्राच्या मदतीने मुलाने केला वडिलांचा खून #murder

Bhairav Diwase
यवतमाळ:- पाथ्रट देवी प्रकल्पात २० दिवसांपूर्वी चादरीत गुंडाळून फेकलेला मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती. मुलाने मित्राच्या मदतीने कुऱ्हाडीने घाव घालून खून केल्याचा उलगडा करण्यात पोलिस पथकाला यश आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगेश मडावी (वय २८), गणेश डायरे (वय ३५, दोघेही रा. सावळा), अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. देवराव गंगाराम मडावी (वय ५५), असे मृताचे नाव आहे. भाऊराव गंगाराव मडावी (वय ५०) यांनी लाडखेड पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यावरून गुन्हा नोंदविला होता. देवराव मडावी व गणेश डायरे यांच्यात जुना वाद होता. पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला. गणेश डायरेला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखविताच त्याने खुनाची कबुली दिली. मृत देवराव यांचा मुलगा मंगेशही खुनाच्या कटात सहभागी असल्याचे सांगितले.