चंद्रपुरातील जायका मोटर्स मध्ये भीषण आग #Fire #firenews

चंद्रपूर:- नागपूर रोड स्थित जायका मोटर्स ला आज सायंकाळी 8 वाजेदरम्यान अचानक आग लागल्याने एकच खळबळ उडाली.
सदर आगीत जायका मोटर्स चे कार्यालय संपूर्ण जळून खाक झाले. कार्यालयाची कामे आटोपल्यावर अचानक (प्राथमिक अंदाज) शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागली, हळूहळू आगीने भीषण रूप धारण केले, या आगीत कार्यालयातील फर्निचर, कॉम्प्युटर जळून खाक झाले.
घटनेची माहिती मिळताच धारिवाल कंपनीतील अग्निशामक व मनपा अग्निशामक दलाने आगीवर नियंत्रण मिळविले. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत