Click Here...👇👇👇

CSTPS येथे एक वाघ जेरबंद #tiger

Bhairav Diwase

चंद्रपूर:- चंद्रपूर वीज केंद्र ऊर्जानगर वसाहतीतील न्यू एफ गाळा येथे चंद्रपूर वीज केंद्र विशेष पथक आणि वनविभागाच्या संयुक्त मोहिमेला यश आले असून सोमवार 21 फेब्रुवारीला रात्री 9.15 च्या सुमारास एका वाघाला जेरबंद करण्यात आले आहे.

मागील काही वर्षांपासून सीएसटीपीएस परिसरात वाघांचा वावर वाढला आहे.अश्यातच एका 55 वर्षीय मजुराला भक्ष्य केले. तर दुर्गापूर नेरी परीसरात बिबट्याने एका 16 वर्षीय युवकाला उचलून नेले.त्यामुळे सर्वत्र दहशत पसरली.प्रकरणाचे गंभीर्य लक्षात घेऊन सर्व लोकप्रतिनिधींनी या वाघांचा बंदोबस्त करा,अशी मागणी लावून धरली.यात ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत,राज्यमंत्री तनपुरे,लोकलेखा समिती अध्यक्ष आ सुधीर मुनगंटीवार यांचा प्रामुख्याने समावेश आहे.