Top News

दुचाकी व मालवाहू पिक अप भीषण अपघात #accident

एक जागीच ठार दोन गंभीर
कोरपना:- कोरपना पोलीस स्टेशन हद्दीतील 21 फेब्रुवारी सायंकाळी सात वाजता ची घटना असून चंद्रपूर आदिलाबाद मार्गावर कोरपणा पावर हाऊस जवळील घटना असून सदर घटनेत दुचाकी क्रमांक एम एच 34 बीपी 5988 स्प्लेंडर व मालवाहू पिक अप क्रमांक एपी 01 -T-6449 भीषण टक्कर होऊन पिक अपने दुचाकीला फरफटत नेले.
दुचाकीवरील जगदीश कोरांगे वय 25 राहणार पिटगव्हाण मंडळ बेला जिल्हा आदीलाबाद याचा घटनास्थळीच मृत्यू झाला व मामा, भाचे शंकर मलकु कोडापे वय 32 व रुपेश रावजी मेश्राम वय 25 वर्ष. रा. रामपूर तह कोरपणा जिल्हा चंद्रपूर दोघा च्या पायाला गंभीर दुखापत झाली.
सदर घटनेची माहिती पोलीस स्टेशन कोरपना मिळताच पोह खोब्रागडे पोशी विनोद पडवाल घटनास्थळी दाखल होऊन गन गंभीर जखमी यांना उपचारासाठी कोरपणा येथे उपचारासाठी दाखल केले व घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय कोरपना येथे आणले. दोघांना पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूरला पाठवण्यात आले पुढील तपास ठाणेदार सदाशिव ढाकणे यांच्या मार्गदर्शनात कोरपना पोलीस करीत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने