🌄 💻

💻

राष्ट्रवादीच्या आमदाराच्या सुरक्षारक्षकाची आत्महत्या #suicide

(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
गडचिरोली:- गडचिरोलीतील आमदाराच्या सुरक्षारक्षकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अहेरी मतदारसंघाचे आमदार आणि माजी राज्यमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या सुरक्षेत तैनात पोलीस शिपायाने टोकाचं पाऊल उचललं.
स्वतःच्या बंदुकीतून डोक्यात गोळी झाडून सुरक्षारक्षकाने आत्महत्या केल्याचा आरोप आहे. गडचिरोलीतील अहेरी उपविभागीय अंतर्गत ताडगाव पोलीस स्टेशनमध्ये पोलीस जवान कार्यरत होता. प्रमोद शोकोकर असे मयत जवानाचे नाव आहे. तो मूळ बुलडाणा येथील रहिवासी होता. ताडगाव पोलीस स्टेशन येथून काही दिवसांपूर्वीच तो आमदार धर्मराव आत्राम आमदार यांच्याकडे सुरक्षा गार्ड म्हणून रुजू झाला होता. कुटुंबातील तणावामुळे त्याने आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांच्या हाती आहे. पुढील तपास करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत