Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo 

अखेर "आदित्य" मृत्यूसोबत झुंज देताना हरला #death


(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
वरोरा:- कॉईलमध्ये वापरल्या जाणाऱ्या कॉपर तारेने पतंग उडवणे चंद्रपूर जिल्ह्यातील बालकाला महागात पडले. पतंग उडविताना कॉपर मांजाचा उच्च दाब विजवाहक तारांना स्पर्श झाल्यावर जोरदार धक्का लागल्याने आदित्य येटे नामक १२ वर्षीय बालक गंभीर जखमी झाला होता. हि घटना 28 जानेवारीला वरोरा तालुक्यातील बोर्डा या गावी घडली महापारेषण अधिकार्‍यांना घटनेची माहिती मिळताच पथक घटनास्थळी दाखल झाले होते.
आदित्य गंभीर जखमी झाल्याने त्याच्या आईवडिलांनी तात्काळ चंद्रपुरातील खाजगी दवाखान्यात दाखल केले, आदित्य उपचाराला प्रतिसाद देत नव्हता, त्यामुळे आदित्यला तात्काळ नागपुरात रेफर करण्यात आले होते.
मात्र घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असल्याने वडिलांनी मदतीची हाक लावली, त्यांच्या मुलाच्या उपचारासाठी अनेक सामाजिक संस्था, लोकप्रतिनिधी, मित्रपरिवार, सामाजिक कार्यकर्ते, वैयक्तीकरित्या आर्थिक मदत केली होती. मात्र मृत्यूशी झुंज देताना आदित्य अपयशी ठरला, तब्बल 23 दिवसांनी आदित्यचा मृत्यू झाला. आदित्यच्या आई वडिलांवर जणू दुःखाचा डोंगर कोसळला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत