वैनगंगा नदीत अंघोळीला गेला अन् बुडून मेला #death

Bhairav Diwase

चंद्रपूर:- आंघोळ करायला जाणे एका युवकांच्या जीवावर बेतले. चंद्रपूरच्या ब्रम्हपुरी शहरालगत वैनगंगा नदीपात्रात बुडून तरुणा चा दुर्दैवी मृत्यू झाला. अभिनव दौलतराव कुथे (23) असे मयत युवकाचे नाव असून तो गडचिरोलीच्या आरमोरी येथील रहिवासी आहे.
अभिनव कुथे हा चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी–आरमोरी मुख्य महामार्गावर असलेल्या नदिघाट पुलाजवळील वैनगंगा नदी पात्रात आईसह गेला होता. यावेळी त्याची आईही नदीपात्रात थोड्या पाण्यात उभी होती तर अभिनव पाण्यात अंघोळीसाठी उतरला. गेले दोन दिवस वैनगंगा नदीपात्रात पाण्याची पातळी वाढली असून पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने अभिनव काही क्षणातच वैनगंगा नदी पात्रात दिसेनासा झाला.
अभिनव बुडाल्याचे लक्षात येताच तात्काळ पोलिस आणि आपत्ती व्यवस्थापनाला याची माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. यंत्रणांनी प्राथमिक शोध मोहीम सुरू केली. अद्याप अभिनव सापडला नाही.