Top News

म्हणूनचं... आशिषदादा अवर लीडर वाटतो!



तोंडात खडीसाखर, डोक्यावर बर्फ ठेऊन चेहऱ्यावरची सुरकुती हलू न देता बल्लारपूरात राजकारण खेळले जाते असे ऐकिवात आहे.
राजकारणात प्रत्येक माणूस तोंडावर जेवढा गोड बोलतो त्याच्या दुप्पट माघारी कडू तसेच निर्दयी वागत असतो. असेही थोर-मोठे अनुभवाने सांगतात.

तरीही अशा “कुटील राजकारणात आणि राजकारण्यांत” वावरत असतांना चांगल्या-चांगल्यांना ज्याच्या उपस्थितीची दखल घ्यावीचं लागते.. असा उमदा नेतृत्व म्हणजे, आशिष देवतळे!

आशिष दादाला भाजयुमोचा महामंत्री असतापासून मी पाहतो आहे. प्रत्येक कार्यात स्वतः हीरहीरीने सहभागी होऊन ते सिद्धीस जाण्यासाठी हा माणूस झटतो. 
वाणी नम्र, वृति जिज्ञासू आणि कृति सर्वसमावेशक अशी त्यांच्या व्यक्तिमत्वाची मांडणी करता येईल..
त्यातही, पूर्वाश्रमीचा शिवसैनिक असल्याने हिंदूहृदयसम्राट बाळासाहेबांचा ओजस्वी गुरगुरणं त्यांच्यात दिसतोच. 

भाजपात युवा मोर्चाला बॅकबोन म्हटल्या जाते. त्यामुळे आपसूकचं या बॅकबोनचा कर्णधार सुद्धा तरुण, तडफदार शिवाय जिल्ह्यातील विखुरलेल्या युवावर्गाला एकसंघ करत राजकारणाशी जोडेल आणि त्यांच्या दशेला दिशा देईल.. असा जिल्हाध्यक्ष म्हणून लोकनेते आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी आशिष दादाला निवडलं! 

तेव्हापासून आशिष दादा सातत्याने युवा मोर्चाच्या माध्यमातनं जिल्ह्यात सर्वदूर आपल्या कामाचा आलेख उंचावत आहे. 
प्रत्येक कार्यकर्त्याला उचित सन्मान, प्रत्येकाशी नियमित वार्तालाप, प्रत्येकाला आपलेपणाची जाणीव आणि वागण्या-बोलण्यात सहजता. अशा कित्येक गोष्टींमूळे आशिष दादा आम्हा अनेकांना “येस ही इज अवर लीडर” वाटतो.
 
आज आशिष दादाचा वाढदिवस!
लोकनेते, विकासपुरुष आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात तसेच युवानेते देवरावदादा भोंगळे यांच्या मार्गदर्शनात आशिष दादा जिल्हा भाजयुमोचे कप्तान म्हणून दमदार बॅटिंग करत आहेतचं, येणार्‍या काळातही युवा मोर्चाच्या माध्यमातून त्यांच्या हातून अनेकानेक लोकहीताचे कार्य घडोत, त्यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील शेकडो युवकांचे प्रश्न सुटोत, आणि 
त्यांच्या सार्‍या मनोकामना पूर्ण होवोत! हीच माता महाकाली चरणी प्रार्थना! ❤️💐💐

सदिच्छेसह......
मंगेश मादेशवार, भाजयुमो.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने