चंद्रपूर:- बुधवारी रात्री च्या सुमारास 52 वर्षीय भोजराज मेश्राम यांना वाघाने ठार केल्याची घटना ताजी असताना पुन्हा दुर्गापूर नेरी येथे राहणारा 16 वर्षीय मुलगा राज भडके याला बिबट्याने उचलून नेल्याची घटना गुरुवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास घडल्याने परिसरात चांगलीच दहशत निर्माण झाली आहे.
दुर्गापूर ग्रामपंचायत च्या मागील भागांत राज हा जात असताना अचानक बिबट्याने त्यांचेवर हल्ला केला, घटनेची माहिती मिळताच दुर्गापूर पोलीस व वनविभागाच्या चमूने शोधकार्य सुरू केले होते. मात्र काल शोध घेतला असता मृतदेह सापडला नाही. आज पुन्हा शोध घेतला असता दुर्गापूर नेरी येथे राहणारा 16 वर्षीय मुलगा राज भडके यांचा मृतदेह सापडला आहे. पुढील तपास करीत आहेत.