Click Here...👇👇👇

आ. सुधीर मुनगंटीवार जेष्ठांचा आदर व सन्मान करणारे लोकनेते! #Mul

Bhairav Diwase

जिथे जेष्ठांचा आदर व सन्मान होतो त्या देशाचे भविष्य फार मोठे असते,असं एक वचन आहे. हे वचन केवळ ऐकण्या-बोलण्यापूरते मर्यादित न ठेवता आ.सुधीर मुनगंटीवार नेहमी जेष्ठांना आदर व सन्मान देतात, असा अनुभव त्यांच्या उपस्थितीत आयोजित होणाऱ्या विविध कार्यक्रमांमधून सातत्याने येतो. लोकांच्या गरजा, न्याय आणि हक्कांसाठी लढणारा एक लढवय्या नेता म्हणून एक आत्मियतेची ओळख आधीच लाभलेल्या सुधीर मुनगंटीवार यांच्या संदर्भातील हा अनुभव एका लोकनेत्याच्या सामाजिक कारकीर्दीतील अनेक अपवादात्मक, अनुकरणीय बाबींमध्ये भर ठरला आहे.
महाराष्ट्राचे अर्थमंत्री असताना जेष्ठांचे निराधार अनुदान वाढविण्यासाठी घेतलेला पुढाकार असो किंवा हजारो जेष्ट नागरिकांसाठीचे नेत्रतपासणी शिबीर , चष्मेवाटप कार्यक्रम, मुनगंटीवार यांनी नेहमीच जेष्ठांच्या आरोग्यासाठी जबाबदारी पार पाडली आहे. एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमाला स्वतः उपस्थित असताना लोकार्पण किंवा भूमिपूजन सोहळ्यात जेष्ठांना कायम पुढे करत त्यांना मानसन्मान देण्याची, जेष्ठांच्या हातून कार्यक्रमाचे उदघाटन करवून घेण्याचा तसेच जेष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यासाठी पुढाकार घेण्याची त्यांची भूमिका सर्वदूर चर्चेची ठरते आहे.
महाराष्ट्रासारख्या विकसनशील राज्यात जेष्ठ नागरिक ही देशाची व राज्याची फार मोठी संपत्ती आहे हे लक्षात घेऊन जेष्ठ नागरिकांविषयीची आत्मियता वेगवेगळे निर्णय, उपक्रम आणि कॄती यातून जोपासणारे आ.सुधीर मुनगंटीवार हे आजघडीला जेष्ठांच्या आपुलकीचे केंद्र बनले आहे.
मूलवासीय भारावले

बुधवारी मूल येथे सीसी रोडचे बांधकाम, चौक सोदर्यीकरण, पेव्हर ब्लाक , नाली बांधकामाचे भूमिपूजन यांचे करण्यासाठी आ.सुधीर मुनगंटीवार हे मूल मध्ये उपस्थित होते. सर्व शुभारंभ सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते होणे अपेक्षित आणि पूर्वनियोजित असताना मुनगंटीवार यांनी कधी उपस्थितांपैकी जेष्ठ नागरिक, तर कुठे एखाद्या गरीब व्यक्तीला भूमिपूजन करायचा मान दिला. शुभारंभ त्यांच्या हस्ते पार पडला. या कृतीने कार्यक्रमस्थळी उपस्थित नागरिकांच्या मनात आपसूकच सुधीर मुनगंटीवार यांच्या बाबतीत आदरभाव बघायला मिळाला, या कारणामुळेच आ.सुधीर मुनगंटीवार हे तरुणांपासून तर जेष्ठांच्या हृदयात अधिराज्य गाजवतात त्याचे गमक नव्याने स्पष्ट झाले.