Top News

वाघाच्या हल्ल्यात महिला ठार #tiger #tigerattack


या दोन्हीही घटना ताजी असताना आज मुल तालुक्यातील कोसंबी येथे शेतात काम करणाऱ्या महिलेवर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना घडली. मृतक महिला कोसंबी येथील ग्यानीबाई वासुदेव मोहूर्ले वय अंदाजे 60 वर्षे असे आहे.
सविस्तर वृत्त असे की, ग्यानीबाई मोहूर्ले स्वतःच्या मालकीच्या शेतात शेतीचे काम करीत असताना वाघाने महिलेवर हल्ला करीत ठार केले असून सदर घटना अंदाजे 4.30 वाजताच्या सुमारास घडल्याची प्राथमिक माहिती आहे.
सदर घटनेची माहिती मिळताच मुल पोलीस स्टेशन चे ठाणेदार सुशांतसिंह राजपूत, वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास करीत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने