समतानगर प्रभाग क्रमांक १ शिव मंदिराजवळ शिबिराचे आयोजन
(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
चंद्रपूर:- भारतीय जनता पार्टी हा सदैव गरीब, गोरगरिबांसाठी काम करणारा पक्ष आहे. समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत प्रत्येक योजना विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून पोहोचते. यासाठी गेल्या चार रविवारपासून प्रत्येक प्रभागात मोफत ई-श्रमिक मोफत कार्ड शिबिर भारतीय जनता युवा मोर्चा चे जिल्हा सचिव राहुल बिसेन यांच्यावतीने आयोजित करण्यात येत आहे.
प्रत्येक रविवार प्रमाणे या रविवारी समतानगर प्रभाग क्रमांक 1 शिव मंदिराजवळ मोफत शिबिराचे आयोजन राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या मार्गदर्शनाखाली व भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे व भाजपा उपाध्यक्ष रामपाल सिंग व जिल्हा परिषद सदस्या वनिता आसुतकर यांच्या मार्गदर्शनाखाली व राहुल बिसेन यांच्या नेतृत्वाखाली मोफत ई-श्रमिक कार्ड शिबिर घेण्यात आले.
यामध्ये शिबिरात 146 मजुरांनी सहभाग घेतला. या शिबिरात भाजपच्या जेष्ठ कार्यकर्त्या गीताबाई नन्नवरे, तालुकाध्यक्ष हनुमान काकडे, ओबीसी आघाडी तालुकाध्यक्ष नामदेव आसुटकर, भाजपा कार्यकर्ते रमेश बिस्वास, श्रीनिवास, मदन, मा. चिवंडे, राज भडकले इ. तसेच शेखर वानखेडे, उत्तम पासवान, दिलीप चौरे, प्रेम सूर्यवंशी यांचे शिबीर यशस्वी करण्यात मोलाचे योगदान दिले.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत