मनपटलावर दुभंगलेल्या तुझ्या मनाला
अनेक स्वार्थी लोकांची साथ आहे
कारण दुसऱ्याचा मोठेपणा म्हणजे
त्यांच्या अंतःकरणाचा घात आहे
नकळत उडविलेल्या शिंतोड्यांना
मी आज धूत आहे
तू माझ्याजवळ प्रत्यक्ष बोल
का तू मला भीत आहे
तलवारीचा आकार म्यानच ठरवीत असतो समजदार लोक दुसऱ्यावर
विसंबून राहत नसते
या गोष्टीचा थोडा विचार कर
नाहीतर तुझी करणी तू स्वतःच भर
या खदखदणाऱ्या ज्वालातून
ज्वालामुखी होऊ देऊ नको
माझ्या अंतःकरणातील जखमांना तरी
आता तू चिघळू देऊ नको
मानकर सर, घुग्घुस
Khup chhan sir
उत्तर द्याहटवा